विमानतळ विस्ताराचे लवकरच ‘टेक ऑफ’ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागपूर - नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक व खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्त साहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे या तत्त्वावर करण्यासाठी आवश्‍यक दस्तावेजांना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे विमानतळाच्या विस्ताराचे लवकरच टेक ऑफ होणार आहे. 

नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक विमानतळ विकसित होत आहे.या प्रकल्पात नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विशेष आर्थिक क्षेत्र व संलग्न सेवाव्यवसाय असे दोन उपप्रकल्प समाविष्ट आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या केंद्रस्थानी असणारे महत्त्वाचे विमानतळ आहे. सध्या मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत हे विमानतळ चालविण्यात येत आहे. मिहान इंडिया या संयुक्त कंपनीमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांचा अनुक्रमे ५१ व ४९ टक्के हिस्सा आहे. या दोन घटकांनी केलेल्या करारनाम्यानुसार या विमानतळाचा विकास खासगी विकासकाकडून करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

विमानतळाचे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून करणे तसेच संकल्पना, बांधणी, वित्त साहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे या तत्त्वावर करण्याबाबत २३ जुलैला मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यास अनुसरून अर्हतेकरिता पाच कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या पाच कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी, प्रस्तावाकरिता विनंती आणि सवलत करारनामा या दस्तावेजांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Web Title: nagpur news Airport extension