माधुरी, सलमानला कशाला भेटायचे? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

नागपूर - भाजप व्हीआयपी आणि उद्योजकांचा पक्ष आहे. त्यामुळे ते प्रसिद्ध लोकांना भेटत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपच्या संपर्क यात्रेवर केली. आमच्या पक्षाची नाळ सर्वसामान्यांसोबत जुळली असल्याने आमचे बडे नेते छोट्याशा खेड्यातही जातात असे त्यांनी सांगितले. 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी एचएमटी वाणाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड नावाच्या छोट्याशा गावात जाऊन सांत्वन केले. त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येथील शेतकऱ्यांसोबतही त्यांनी संवाद साधला. राहुल गांधी यांच्यासोबत अशोक चव्हाण आणि प्रदेश प्रभारी मोहन प्रकाशही नागपूरला आले  होते. ते परतल्यानंतर चव्हाण यांनी विलास मुत्तेमवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकारांसोबतही संवाद साधला. काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते दिल्लीवरून छोट्या छोट्या गावात जातात. हा फरक भाजप आणि काँग्रेसमधील आहे. त्यामुळे आम्हाला सेलिब्रिटींना भेटण्याची गरज नाही, असेही चव्हाण म्हणाले. 

जातीवादी भाजपला पराभूत करण्यासाठी राष्ट्रावादीसोबत बसप, रिपब्लिकन, समाजवादीसह सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत घेण्याचा आमचा मानस आहे. आगामी निवडणुकीत भाजपला आम्ही निश्‍चितच पराभूत करू असा विश्‍वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

Web Title: nagpur news ashok chavan