५० रुपयांच्या मोहात गमावले १४ लाख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नागपूर - एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅश व्हॅनच्या चालकाला ५० रुपयांचे आमिष भोवले. अण्णा गॅंगने चालकाजवळ दहा रुपयांच्या पाच नोटा टाकल्या आणि पैसे पडल्याचे सांगितले. चालक पैसे उचलण्यासाठी गेल्यानंतर अण्णा गॅंगने कॅशव्हॅनमधील १४ लाखांची रक्‍कम असलेली पेटी लांबवली. अतिशय जलदगतीने केलेल्या या चोरीमुळे पोलिसही हैराण झालेत. ही घटना झाशी राणी चौकाजवळील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी नीलेश चंद्रभान दारोटे (१८, रा. चिखली, कळमना बाजार) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. 

शहरातील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम सिसको सिक्‍युरिटी सर्व्हिसेस या खासगी संस्थेमार्फत सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी नीलेश सहकाऱ्यांसह एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी व्हॅनने झाशी राणी चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएमवर पोहोचला. एटीएमसमोर वाहन उभे केले आणि काही कर्मचारी मशीनमध्ये

५० रुपयांच्या मोहात गमावले १४ लाख 
पैसे भरण्यासाठी गेले. त्यांचा पाठलाग करीत असलेल्या अण्णा गॅंगने त्यांच्यावर पाळत ठेवली. चालकाच्या समोर एकाने दहा रुपयांच्या पाच नोटा टाकल्या. दुसऱ्याने चालकाजवळ जाऊन पैसे पडल्याचे सांगितले. चालकाच्या मनाला लालच सुटली. त्याने लगेच वाहनाखाली उतरून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. तेवढ्या एका मिनिटाच्या कालावधीत अण्णा गॅंगने कॅशव्हॅनमधील पेटी लंपास केली. त्या पेटीत १४ लाख रुपयांची रक्‍कम होती. झाशी राणी चौकात पैसे भरल्यानंतर बुटीबोरीला पोहोचल्यावर व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना पैशांची पेटी नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी धंतोली पोलिस व्हॅनमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करीत आहेत. एपीआय रवी राजूरवार यांचे पथक आरोपींचा शोध घेत आहे.

चोरटा कोण? 
कॅश व्हॅनमध्ये बंदूकधारी सिक्‍युरिटी उपस्थित असतो. तो नेहमी कॅशपेटीजवळ सुरक्षेसाठी तैनात असतो. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी काही कर्मचारी गेले होते. मात्र, सिक्‍युरिटी गार्ड त्यावेळी काय करीत होता? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या चोरीवर पोलिसांनाही नियोजित प्लान असेल काय? असा संशय निर्माण झाला आहे. 

अण्णाची दहशत 
शहरात विशेष करून कारचालकांना लुटण्यात अण्णा गॅंगचा हातखंडा आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांनी अशाचप्रकारे कारसमोर पैसे फेकून चालकाचे लक्ष विचलित करून लूटमार केली आहे. अण्णा गॅंग हे पोलिसांसमोरील जुनेच आव्हान आहे. मात्र, आतापर्यंत ही गॅंगच पोलिसांवर भारी पडली आहे.

Web Title: nagpur news ATM cash van