समान कामाला समान वेतन देणार - बंडारू दत्तात्रय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, किमान वेतनात वाढ तसेच समान  काम समान वेतनाचे विधेयक लवकरच संसदेत सादर केले जाणार असल्याचे आश्‍वासन केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिले. भारतीय मजदूर संघाच्या कानपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कामगारांना योग्य वेतन देण्याच्या दिशेने काम करीत आहेत. याकरिता समान वेतन समान काम याचे विधेयक तयार केले जात आहे. ते मंजूर झाल्यानंतर राज्यांना किमान वेतनापेक्षा जादा वेतन देण्याचाही अधिकार दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर असंघटित कामगारांना ओळखपत्र दिले जातील, अंगणवाडी व आशा सेविकांना सामाजिक सुविधा प्रदान केल्या जातील. त्यांचा विमा, वैद्यकीय योजना, भविष्य निर्वाह निधी आदी सुविधाही त्यांना दिल्या जाणार असल्याचे यावेळी बंडारू दत्तात्रय यांनी दिले.

भामसंचे राष्ट्रीय अध्यक्ष बैजनाथ रॉय यांनी अध्यक्षीय भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयाला संघटना विरोध करेल तर सुधारणा केल्या जात असेल तर सकारात्मक भूमिका घेतल्या जाईल, असे सांगितले. अधिवेशनात देशभरातून साडेपाच हजार निवडक प्रतिनिधी उपस्थित होते. यात विदर्भातील वसंतराव पिंपळापुरे, रमेश पाटील, अशोक भुताड, चंद्रशेखर खानझोडे, विनायक जोशी, नितीन बोखणकर, राजीव पांडे, श्रीराम भाटवे, सुरेश चौधरी, नीता चौबे, अर्चना सोहनी, शिल्पा देशपांडे आदींचा प्रामुख्याने समावेश होता.

Web Title: nagpur news Bandaru Dattatreya Bill