बॅंक अधिकारी युवतीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नागपूर - ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या बॅंकेत अधिकारी असलेल्या तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा धक्कादायक प्रकार जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आला. अक्षय दिलीप सहारे (२८, रा. बॅंक कॉलनी, नारी रोड) असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित २८ वर्षीय मुलगी ही सदरमधील नामांकित व्यवस्थापन महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमाला होती. त्यावेळी आरोपी हा तिच्याच वर्गात शिकत होता. दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अक्षयने तिला विवाहाचे आमिष दाखवले व तिला घर सोडून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा आग्रह धरला. तिने लगेच आईवडिलांना सोडून त्याची खोली गाठली. दरम्यान, आरोपीने पत्नीप्रमाणे वागवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

दरम्यान, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरोपी हा एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. तर पीडित मुलगी एका बॅंकेत नोकरी करते. तिने लग्नाचा आग्रह धरला असता तो टाळाटाळ करू लागला. एक दिवस तो तिला सोडून निघून गेला. त्यानंतर पीडितेने त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्याशी संबंध तोडले व लग्नास नकार दिला. त्यानंतर तरुणीने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: nagpur news bank officer rape case