शंभर बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित 100 बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन करीत संबंधित महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत शंभरही महाविद्यालयांना लवकरच नोटीस बजावण्यात येईल. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित 100 बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन करीत संबंधित महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत शंभरही महाविद्यालयांना लवकरच नोटीस बजावण्यात येईल. 

विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाची बैठक मंगळवारी (ता. 24) झाली. या वेळी बीएड महाविद्यालयांवर कडक कारवाईचे संकेत देत संलग्नता रद्दची नोटीस बजावण्यावर शिक्‍कामोर्तब झाले. "नॅशनल काउंन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन' (एनटीसीई)चे मापदंड पूर्ण न करू शकणारे नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक कॉलेज आहेत. यासंबंधी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देत न्यायालयाने अशा महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्याची अंमलबजावणी करीत संलग्नता रद्द करण्याच्या दिशेने अजून एक पाऊल उचलण्यात आले आहे. हायकोर्टाने विद्यापीठाला निम्न दर्जाच्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याच्या कारवाईचे आदेश दिले होते. विद्यापीठाने ज्या महाविद्यालयांचे नाव निम्न दर्जाच्या यादीत आहे; अशा काही महाविद्यालयांना स्थायी संलग्नता दिली असल्याने विद्यापीठापुढे तांत्रिक अडथळा होता. 

यावर मंगळवारी विद्यापीठाच्या महाविद्यालयांची स्थायी संलग्नता हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर ज्यांनी संलग्नीकरणासाठी काही वर्षांपासून अर्जच केले नाही, अशाही महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यापीठाकडून पूर्ण गुण न मिळविलेल्या महाविद्यालयांचाही यात समावेश असणार हे विशेष. 

महाविद्यालयांमधील त्रुटी 
बीएड महाविद्यालयांमध्ये एका प्राचार्यासह 7 शिक्षक असणे अनिवार्य आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये शंभर टक्‍के जागा आहेत. मात्र, अनेक महाविद्यालयांमध्ये एकही नियमित शिक्षक नियुक्त करण्यात आले नाही. ज्या महाविद्यालयांची संख्या व्यवस्थित आहे, तिथे प्रवेश कमी आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये एनटीसीईच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.

Web Title: nagpur news BEd colleges