काल शपथ, आज घेतली लाच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता सप्ताह सुरू आहे. त्या निमित्ताने महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही लाच घेणार नाही,’ अशी मोठ्या तोऱ्यात शपथ घेऊन ‘स्वच्छ शासन-स्वच्छ प्रशासन’ या अभियानास पाठिंबा दर्शविला होता. शपथेच्या दुसऱ्याच दिवशी बाजार विभागाच्या लिपिक बबिता मनोज बक्‍सरेला (वय ४२) यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी कार्यालयातच केली. 

महानगरपालिकेतील अनागोंदी कारभार अनेकदा समोर आला आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी ‘लक्ष्मीदर्शन’ केल्याशिवाय काम करीत नसल्याचे समोर आले होते.  मनपामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर काम करणाऱ्या रामेश्‍वर नंदनवार यांना कामात अनियमितता आणि पंचिंग मशीनशी छेडछाड केल्याप्रकरणी चौकशी अहवालाअंती दोषी आढळल्यानंतर निलंबित करण्यात आले होते. ते गेल्या चार महिन्यांपासून निलंबित होते. त्यांना तीन महिने ५० टक्‍के वेतन मिळत होते. मात्र, कालावधी पूर्ण झाल्यानंतर ७५ टक्‍के वेतन लागू करण्यात यावे, यासाठी विनंती अर्ज मनपा आयुक्‍त कार्यालयात दिला होता. त्या अर्जावर शेरा मारून आयुक्‍तांकडून ७५ टक्‍के वेतन मिळवून देण्यासाठी बाजार विभागाच्या कनिष्ठ लिपिक बबिता मनोज बक्‍सरे हिने ५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, नंदनवार यांना लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी एसीबी कार्यालयात तक्रार केली. बुधवारी दुपारच्या सुमारास बाजार विभागाच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचला. नंदनवार यांनी तडजोड करून दोन हजार रुपये लाच देण्याचे ठरले. बबिताने लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अटक केली. 

लाच देणाराही वादग्रस्त
मनपा विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी सामान्य नागरिकांची अडवणूक करून लाच मागितल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. मात्र, मनपा विभागातीलच कर्मचाऱ्याला लाच मागितल्यामुळे या प्रकरणाची आज दिवसभर शासकीय विभागात चर्चा होती. नंदनवार यांनाही यापूर्वी पंचिंग मशीनशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते.

Web Title: nagpur news bribe