बीएसएनएल मुख्यालयात डिजिटल इंडियाचा सिंह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नागपूर - बीएसएनएलने हिंदी पंधरवाड्यानिमित्त अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत झिरो माईल येथील मुख्यालयात टेलिफोनच्या जुन्या आणि पडीत भागापासून डिजिटल इंडियाचा सिंह साकारण्यात येत आहे. यासोबतच विविध प्रकारांतील चित्र रेखाटून भिंतीही सुशोभित करण्यात येत आहेत.

बीएसएनएलतर्फे १ ते १५ सप्टेंबरदरम्यान हिंदी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांच्या हस्ते पंधरवड्याचे उद्‌घाटन करण्यात आले. हा पंधरवडा अभिनव पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत इमारतीमधील भिंतींवर चित्र रेखाटून शासकीय बाज वगळून कार्यालयाला वेगळा लूक देण्यात येत आहेत.

शुक्रवारीच या उपक्रमाचाही प्रारंभ झाला. या उपक्रमात कार्यालयातील चित्रकलेची आवड असलेल्या कर्मचाऱ्यांनाही सामावून घेण्यात आले आहे. एक भिंत सिग्निचर वॉल म्हणून सुशोभित करण्यात येत आहे. त्यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली नावे लिहून स्वाक्षऱ्या केल्या. स्वाक्षऱ्यांच्या मधोमध डिजिटल इंडियाचा लक्षवेधी सिंह साकारण्यात येणार आहे. याशिवाय अन्य इमारतींवर हिरवळ व वरली पेंटिंग साकारली जात आहे. भारतीय कला आश्रमच्या कलावंतांच्या सहकार्यातून हा उपक्रम पूर्ण करण्यात येत आहे. 

हिंदी पंधरवाड्याच्या उद्‌घाटन सोहळ्याला सहमहाव्यवस्थापक पी. के. एस. बारापात्रे, उपमहाव्यवस्थापक व्ही. पी. जाधव, यू. एन. गजभिये, यू. एम. वासनिक, जी. एन. अडसुळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राजभाषा अधिकारी उज्ज्वला दलाल, धीरज सेवारे प्रयत्नरत आहेत.

Web Title: nagpur news bsnl