जमावाने खासगी बस पेटविली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

सावनेर - नागपूरवरून छिंदवाड्याकडे निघालेल्या मिघलानी बसने सावनेरवरून माळेगावला जाणा-या ऑटोला धडक देऊन ओढत नेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत अन्य चौघे जखमी असून, त्यांना नागपूर वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. गजेंद्र पांडुरंग चांदुरकर (वय ४०), उमेश विनायक दहीकर (वय ३०), कमलाबाई मधुकर पालेकर (वय ७०) अशी मृतांची नावे असून, राजू मधुकर पालेकर (वय ३५), पत्नी अर्चना राजू पालेकर (वय ३०), मुलगा पारस पालेकर यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सवारी घेऊन सावनेरवरून माळेगाव येथे जाणारा ऑटो माळेगाव टाउन येथे गावाकडे वळत असताना नागपूरवरून छिंदवाड्याकडे भरधाव निघालेल्या मिघलानी या खासगी बसने निष्काळजीपणाने धडक देऊन काही अंतरावर ओढत नेल्याने ऑटोमधील गजेंद्र पांडुरंग चांदुरकर (वय ४०), उमेश विनायक दहिकर (वय ३०), कमलाबाई मधुकर पालेकर (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजू मधुकर पालेकर (वय ३५), पत्नी अर्चना पालेकर (वय ३०), मुलगा पारस यांची प्रकृती चिंताजनक आहे. संतप्त गावकऱ्यांनी मिघलानी बसला आग लावून रोष व्यक्‍त केला. या अपघातात ऑटोतील उर्वरित चार प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातानंतर जनक्षोभ उसळला. जमावाने खासगी बसची जाळपोळ करून संताप व्यक्‍त केला. अपघाताची माहिती कळताच सावनेर पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. गडकरी चौकात कळमेश्वर मार्गावर भोपाळ-नागपूर ही बस भोपाळवरून नागपूरकडे जात असताना संतप्त नागरिकांनी फोडली. बसमध्ये १० यात्रेकरू होते.

Web Title: nagpur news bus fire