'कर्करोगावर सर्वात स्वस्त उपचार देण्याचा मानस'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नागपूर - सेवेच्या भावनेतून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची निर्मिती करण्यात येत आहे. जगात उपलब्ध अत्याधुनिक उपचारांसह देशातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय निर्मितीचा आमचा प्रयत्न असून येथे सर्वांत स्वस्त दरात उपचार मिळावेत, असा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

नागपूर - सेवेच्या भावनेतून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची निर्मिती करण्यात येत आहे. जगात उपलब्ध अत्याधुनिक उपचारांसह देशातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय निर्मितीचा आमचा प्रयत्न असून येथे सर्वांत स्वस्त दरात उपचार मिळावेत, असा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेतर्फे जामठा येथे उभारण्यात येत असलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन रविवारी दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उद्योगपती व टाटा ट्रस्टचे प्रमुख रतन टाटा, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, सन फार्मासिटीकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी, आयटीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पुरी, येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर, मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलच्या संचालक डॉ. आशा कपाडीया, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. कैलाश शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले की, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्‌घाटनाचा आजचा दिवस विदर्भासाठी ऐतिहासिक आहे. 20 ते 22 वर्षांपासून कॅन्सर रुग्णालयासाठी प्रयत्न करत होतो. रुग्णालय व्हावे आणि ते देशातील सर्वोत्कृष्ट असावे हाच ध्यास आहे. अनेकांनी मदत दिल्याने येथे गरजूंना किफायतशीर दरात आणि कमीत-कमी त्रास असलेले उपचार मिळतील. भविष्यात रुग्णालय परिसरातच रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याचीही व्यवस्था करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: nagpur news cancer devendra fadnavis