रॅगिंग घेणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो आता सावधान राहा! छुप्या पद्धतीने रॅगिंग करण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते सीसीटीव्ही कॅमेरा टिपून घेईल. त्यामुळे असे प्रकार बंद करण्याचा इशारा येथील ॲन्टी रॅगिंग कमिटीने घेतलेल्या बैठकीत दिला आहे. विशेष असे की, वसतिगृह तसेच इतर परिसरात हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. कमिटीने सीसीटीव्ही लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. 

नवीन विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची रॅगिंग घेण्यात येत असल्याची जोरदार चर्चा दरवर्षी असते. यावर अंकुश लावण्यासाठी केंद्र, राज्य शासनासह विद्यापीठ, महाविद्यालयातील स्थानिक प्रशासन प्रयत्नशील  असते. परंतु, आगामी काळात सीसीटीव्हीतून रॅगिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालयांत रॅगिंग होत असल्याचे कटुसत्य पुढे आले आहे. या प्रकारामुळे येणाऱ्या नैराश्‍यातून जीवहानी होत असल्याच्या गंभीर घटनांचा इतिहास बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरच्या मेडिकलमधील ॲन्टी रॅगिंग कमिटीने २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात विविध पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. मेडिकलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या प्रत्येक वसतिगृहात आवश्‍यक असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचालीवर प्रशासनाकडून नजर ठेवण्यात येईल. आपसांत विकृत वागल्यास किंवा गैरव्यवहार करताना आढळल्यास तातडीने कारवाईचे संकेत दिले आहेत. मेडिकलमध्ये झालेल्या बैठकीला प्रभारी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. उदय नारलावार यांच्यासह मेडिकल विविध विभागप्रमुख होते. 

शुक्रवारी नवीन सत्राला सुरूवात 
मेडिकलमधील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे नवीन सत्र शुक्रवारपासून (४ ऑगस्ट) सुरू होणार आहे. याप्रसंगी प्रवेश घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. मेडिकलमध्ये एमबीबीएसची विद्यार्थी क्षमता २०० असून सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच कार्यक्रमात कुणी रॅगिंग घेत असल्यास तातडीने प्रशासनाला सूचना देण्याचे आवाहनही करण्यात येणार असल्याचे डॉ. दिनकर कुंभलकर यांनी सांगितले.

Web Title: nagpur news cctv Ragging