दाखल्यांसाठी दलालांचा ‘सेतू’ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

नागपूर - सध्या दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले असून पुढील प्रवेशाकरिता आवश्‍यक असणाऱ्या दाखल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू कार्यालयात गर्दी उसळली आहे. पालकांना तातडीने दाखले हवे असल्याने दलालांचा येथे सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक दाखल्याचे दरही त्यांनी ठरविले आहे. 

नागपूर - सध्या दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले असून पुढील प्रवेशाकरिता आवश्‍यक असणाऱ्या दाखल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू कार्यालयात गर्दी उसळली आहे. पालकांना तातडीने दाखले हवे असल्याने दलालांचा येथे सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक दाखल्याचे दरही त्यांनी ठरविले आहे. 

सेतू केंद्र होणारी गर्दी आणि दलालांमार्फत होणारी लूट थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शाळा, कॉलेजमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात येत असून एसएसएम आणि प्रमाणपत्र घरपोच सेवाही सुरू करण्यात आली. मात्र, याचा फारसा परिणाम होत नसल्याने दिसत आहे. विविध प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी, पालकांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात मोठी गर्दी होत असून दलाल सक्रिय झाले आहेत. ५० रुपयांच्या प्रमाणपत्रासाठी दलालांकडून २०० ते ५०० रुपये वसूल करण्यात येत आहे. सेतू केंद्रात १५ वर खिडक्‍या तयार करण्यात आल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेतू केंद्रात रोज दीड हजारवर तर तहसील कार्यालयात रोज पाचशेवर अर्ज दाखल होतात. 

अंकुश लावणे गरजेचे
तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दलालांवर अंकुश लावण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. त्याच प्रमाणे विशेष पोलिस बंदोबस्त लावण्यात होता. पोलिस आणि प्रशासनाच्या माध्यमातून दलालांची धरपकडही करण्यात आली होती. त्यामुळे दलालांवर अंकुश लागला होता. 

साडेसहा हजार प्रमाणपत्रांचे वाटप
१०, ११ व १२ जून रोजी पाच शाळा, कॉलेजमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ६ हजार ४९३ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.     

विशेष कक्षाची गरज
येथे येणाऱ्या अनेकांना प्रक्रिया माहिती नाही. अर्ज मिळण्यासही त्रास होतो. त्यामुळे मार्गदर्शन  केंद्र सुरू केल्यास दलालांवर अंकुश ठेवण्यास मदत होईल.

Web Title: nagpur news certificate agent in setu office