जनतेच्या सहभागानेच देशाची महासत्तेकडे वाटचाल - चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नागपूर - विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना व राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपूर - विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना व राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कस्तुरचंद पार्क येथे प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापनदिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने सुरू करून देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली. 

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत आहे. जिल्ह्यातील ३९ हजार ४४० पात्र लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विजय मराठे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन झाले. पथसंचलनामध्ये ३४ पथके व विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, महानगर आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, माहिती आयुक्त दिलीप धारुरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते. संचालन व समालोचन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर यांनी केले.

पोलिसांचा गौरव
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उत्तम कामगिरी करणारे पोलिस निरीक्षक सुनील दशरथ महाडिक, सहायक पोलिस उपनिरीक्षक माताप्रसाद रामपाल पांडे, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी सुनील विष्णुपंत लोखंडे यांचा गौरव करण्यात आला.

अत्याधुनिक यंत्रांद्वारे सुविधा
शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी शेतीला सिंचनासाठी पाणी तसेच आवश्‍यकतेनुसार विजेचा पुरवठा व प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेचे कवच दिले आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्येही भरीव वाढ केली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक यंत्रांद्वारे सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Web Title: nagpur news chandrakant bavankule talking