छत्तीसगडच्या चोरट्यासह दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नागपूर - छत्तीसगडमधील कुख्यात चोरट्यासह नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट चारने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाखांचा चोरीचा माल जप्त केला. मनोज आगरे (वय 22, दुर्ग-छत्तीसगड) आणि जितेंद्र मुळे (वय 23, रा. देशपांडे ले-आउट, नंदनवन) अशी चोरट्यांची नावे आहेत. 

मनोज आगरे हा कारपेंटरचे काम करीत होता तर जितेंद्र हा हमालीचे काम करीत होता. एकाच वस्तीत राहत असल्यामुळे दोघांची ओळख झाली. शहरात या दोघांनी सहा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. नंदनवन हद्दीत चार तर हुडकेश्‍वर हद्दीत दोन ठिकाणी चोरी करीत लाखोंचा माल लंपास केला होता. 

चोरीवरच गुजराण 
मनोज आणि जितेंद्र या दोघांच्याही घरी चोरीचेच सामान होते. स्वयंपाकघरात पिठापासून ते मिठापर्यंत तर सिलिंडरपासून ते पाण्याच्या माठापर्यंत चोरीचेच सामान होते. गॅस सिलिंडर संपले की दोघेही एखाद्या घरात जाऊन दोन सिलिंडरची चोरी करीत होते. तसेच दुकानातून किराणाचे सामानही चोरी करून गुजराण करीत होते, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. 

मनोज हा सुतार असल्यामुळे घराच्या खिडकीची काच किंवा दरवाजाची कडी कशी उघडावी, याची माहिती होती. त्यामुळे तो खिडकीचा स्क्रू अलगद काढून घरात प्रवेश करीत होता. त्याची मोडस ऑपरेंडी (गुन्ह्याची पद्धती) सारखीच असल्यामुळे पीएसआय मनीष वाकाडे यांनी काही सुतारांवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर मनोजचा शोध लागला. 

Web Title: nagpur news Chhattisgarh thieves arrested