शहर बससेवेची  चाके पुन्हा थांबणार! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

नागपूर - शहर बससेवेवरील संकट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. बस चालविणाऱ्या तीन ऑपरेटरपैकी एसआयएस या कंपनीने अद्याप वेतन न दिल्याने आज हिंगणा डेपोत कंडक्‍टरनी नारेबाजी केली. त्यांनी तिकीट मशीन घेण्यास नकार दिल्याने तीन तासांपर्यंत या रोडवरील बससेवा ठप्प झाली होती. त्यांनी सोमवारपासून सेवा देण्यास नकार दिल्याने बसची चाके पुन्हा थांबण्याची शक्‍यता आहे. 

शहर बसमधील कंडक्‍टरचे वेतन साधारणपणे १० तारखेपर्यंत होते. परंतु आज २४ तारीख उजाडली. मात्र, त्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे सर्वच कंडक्‍टर संतापात होते. आज सकाळी हिंगणा डेपोमध्ये कंडक्‍टरने वेतन न मिळाल्याने तिकीट मशीन घेण्यास नकार दिला. त्यांनी तीन तासांपर्यंत बस रोखून धरल्या. अखेर परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी हिंगणा डेपो गाठून कंडक्‍टरला सोमवारी दोन वाजतापर्यंत वेतन जमा करण्याचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर बस सुरू झाली. 

मात्र, सोमवारी दोन वाजतापर्यंत वेतन न मिळाल्यास तीन वाजतापासून बस बंद करण्याचा इशारा कंडक्‍टरने दिला. 

‘मेस्मा’ काळात संप केल्यास कारवाईची शक्‍यता
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २१ फेब्रुवारीपासून शहर बससेवेसंदर्भात मेस्मा लागू केला. ‘मेस्मा’चा कालावधी सहा महिने असतो. त्यामुळे कंडक्‍टरने संप केल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: nagpur news city bus