‘सिव्हिक ॲक्‍शन ग्रुप’ची ‘क्‍लीन धरमपेठ’ मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नागपूर - धरमपेठ स्वच्छ असावे आणि वाहतुकीला शिस्त लागावी तसेच फुटपाथ क्‍लीन करण्यासाठी ‘सिव्हिक ॲक्‍शन ग्रुप’ने (कॅग) अभिनव उपक्रम सुरू केला आहे. धरमपेठमधील दुकानदारांनाही या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी कॅगने आवाहन केले. कॅगने आज बुधवारी पोलिस आणि मनपाच्या अधिकाऱ्यासोबत परिसरात दौरा केला. कॅगचे जवळपास २५ ते ३० सदस्यांनी रस्त्यावर बसणारे हातठेलेचालक तसेच दुकानदारांचे दुकानाबाहेरील अतिक्रमण काढण्याची विनंती केली. यानंतर धरमपेठमधील परिसर स्वच्छता राखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सर्वांनी समोर येण्याची विनंती नागरिक तसेच दुकानदारांना करण्यात आली.

नागपूर - धरमपेठ स्वच्छ असावे आणि वाहतुकीला शिस्त लागावी तसेच फुटपाथ क्‍लीन करण्यासाठी ‘सिव्हिक ॲक्‍शन ग्रुप’ने (कॅग) अभिनव उपक्रम सुरू केला आहे. धरमपेठमधील दुकानदारांनाही या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी कॅगने आवाहन केले. कॅगने आज बुधवारी पोलिस आणि मनपाच्या अधिकाऱ्यासोबत परिसरात दौरा केला. कॅगचे जवळपास २५ ते ३० सदस्यांनी रस्त्यावर बसणारे हातठेलेचालक तसेच दुकानदारांचे दुकानाबाहेरील अतिक्रमण काढण्याची विनंती केली. यानंतर धरमपेठमधील परिसर स्वच्छता राखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सर्वांनी समोर येण्याची विनंती नागरिक तसेच दुकानदारांना करण्यात आली. कॅगने धरमपेठमधील लक्ष्मीभुवन चौकातून या मोहिमेस प्रारंभ केला.

रस्त्याच्या बाजूने असलेल्या दुकानदारांना या कॅगमध्ये समाविष्ट होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व विवेक रानडे, मेहरलाल जोशी, प्रशांत बुथ, डॉ. निर्मला वझे, अनिल शहाणे, विनोद आठवले, संजय जोग, यतिंद्र इंदापवार, अतुल हरडे, श्रीपाद इंदोरीकर आणि अविनाश साठे यांच्यासह २५ पेक्षा जास्त सदस्य उपस्थित होते. संपूर्ण शहरात स्वच्छता राहावी आणि  वाहतुकीस शिस्त लागावी, या संकल्पनेतून कॅगची निर्मिती झाली. यामध्ये शहरातील युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश व्हावा आणि नागपूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी कॅग काम करणार आहे. सध्या धरमपेठ परिसराचा विकास आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात येत  आहे. हळूहळू सर्व शहरात कॅग स्थापन करण्यात येईल. धरमपेठ दिवसेंदिवस विकासाच्या वाटेवर जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील अन्य परिसरात राहणाऱ्या युवक आणि नागरिकांनी समोर यावे. त्यांनी कॅगच्या मोहिमेत सहभागी व्हावे. त्यामुळे संपूर्ण शहर स्वच्छ आणि निर्मळ होण्यासाठी मनपा आणि पोलिसांसह अन्य विभागाला मदत होईल. ‘लेट्‌स स्टार्ट फ्रॉम होम’ हे ब्रीदवाक्‍य डोळ्यासमोर ठेवून हे अभियान सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया कॅगच्या सदस्यांनी दिली.

Web Title: nagpur news civic action group