विरोधी पक्षनेत्यावर ताशेरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे सभागृहात स्वपक्षीय  नगरसेवकांना सहकार्य करीत नसल्याबाबत शहर काँग्रेसच्या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शहर काँग्रेसमधील वादाची धग अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. याशिवाय संघटनेच्या बैठकीत अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिले.

शहरातील पाण्यासह इतर नागरी समस्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी शहर काँग्रेसची बैठक मंगळवारी देवडिया काँग्रेस भवनात पार पडली. शहर काँग्रेस अध्यक्ष ठाकरे यांच्या अध्यक्षतेत  पार पडलेल्या बैठकीत माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, नगरसेविका दर्शनी धवड, नगरसेवक हरीश ग्वालवंशी, सरचिटणीस बंडोपंत टेंभूर्णे, उमाकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, रमेश पुणेकर, ॲड. अक्षय समर्थ, संदेश सिंगलकर आदी उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांकडून नागरी समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत सर्वच नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत भ्रष्ट कंपन्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. बेरोजगारांना नोकरी देण्याबाबत खासदार काहीही बोलत नाही; मात्र क्रीडा महोत्सवातून लाखोंचे वाटप करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला. नागरी समस्यांविरोधात १७ मे रोजी महापालिका आयुक्तांचा घेराव करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Web Title: nagpur news comment on the Leader of Opposition