अजित पवारांकडून टाळ्यांसाठी दिशाभूल - चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नागपूर - आजपर्यंत एकाही थकबाकीदार शेतकऱ्याची वीज कापलेली नाही. मात्र, भाषणांमध्ये सरकारवर आरोप केल्याशिवाय कुणी टाळ्या वाजवत नाही, हे माहिती असल्याने माजी ऊर्जामंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत टाळ्या पडाव्यात याकरिता वीज कापल्याचे आरोप करीत असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

अजित पवारांचे आरोप व त्यास बावनकुळे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये चांगलेच वाक्‌युद्ध रंगणार असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्‍शन कापले जात आहेत, असे आरोप करून मंत्र्यांना गावबंदी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले जात आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, ऊर्जामंत्री असताना अजित पवार यांनी शेकडो डीपी आणि लाखो शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन कापले आहे. त्यामुळे या विषयावर बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही. सरकार शेतकऱ्यांचे कनेक्‍शन कापणार नाही. शेतकऱ्यांवर २० कोटी थकीत आहे. त्यांना फक्त मुद्दल रक्कम भरण्याचे आवाहन केले आहे.

मुद्दल भरल्यास व्याजाची रक्कम माफ होणार आहे. त्यातही तीन ते पाच हजार रुपयेच आधी भरायचे आहेत. हे सर्व माहिती असताना आकसापोटी अजित पवार फक्त राजकारण करत असल्याचेही बावनकुळे म्हणाले. एमएससीडीसीएलकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला सादर केला असून, त्यांनी यास मंजुरी दिली नसल्याचे त्यांनी ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: nagpur news confussion by ajit pawar