काँग्रेसची ‘ती’ मुले आता भाजपच्या तंबूत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागपूर - काँग्रेसच्या नेत्यांनी केवळ आपल्या मुलांचेच भले केले. या केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी ‘ती’ मुले आता भाजपच्याच तंबूत शिरली असल्याचे प्रत्युत्तर त्यांना दिले. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भाच्या विकासाऐवजी केवळ स्वतःच्या मुलांचाच विकास केला,  असा आरोप करून आता भाजपची सत्ता आल्यानंतर विदर्भाच्या विकासाला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुत्तेमवार म्हणाले, गडकरी यांचा बोलण्याचा रोख कोणत्या काँग्रेस नेत्यांबाबत आहे, हे कळायला कठीण आहे. मात्र, जे काँग्रेस नेते मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज उघडून शिक्षण संस्थांचे जाळे विणून धनाढ्य झाले. त्या नेत्यांच्या मुलांना भाजपने आता आमदार केले आहे. या ‘महानकार्या’साठी दस्तुरखुद्द नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. याचा नेमका विसर गडकरींना पडलेला दिसतो, असेही मुत्तेमवार म्हणाले. माझी मुले व्यवसाय करतात, हे सांगत असताना नितीन गडकरी यांनी यासाठी पैसा कुणाकडून घेतला होता, यात कोण भागीदार आहेत? हेही सांगायला पाहिजे होते. मात्र, त्यांनी ते सोयीस्कर टाळले. असे असले तरी ‘पब्लिक सब जानती है’ अशा शब्दात मुत्तेमवार यांनी गडकरींना टोला लगावला.

Web Title: nagpur news congress bjp