काँग्रेस स्वीकृत सदस्याचा निर्णय आता लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नागपूर - स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसच्या दोन गटनेत्यांनी दोन सदस्यांच्या नावांची शिफारस केली. एका गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात पुढील सुनावणी होणार असल्याने कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी काँग्रेस स्वीकृत सदस्यपदाबाबत कायदेशीर सल्लागाराचे मत घेण्यात यावे, असे प्रशासनाला निर्देश दिले. त्यामुळे काँग्रेसच्या स्वीकृत सदस्याची सभागृहातील घोषणा लांबणीवर पडली असून विकास ठाकरे गटाला तूर्तास दिलासा मिळाला. 

महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य निवडीचा प्रस्ताव आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आला. संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार तर, काँग्रेसचा एक स्वीकृत सदस्य सभागृहात येणार आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपकडून चार जणांचे अर्ज आले. मात्र, काँग्रेसला एकच जागा मिळाली असताना माजी महापौर विकास ठाकरे व माजी नगरसेवक किशोर जिचकार असे दोन  अर्ज आले. विकास ठाकरे यांच्या नावाची शिफारस तत्कालीन गटनेते संजय महाकाळकर यांनी  तर किशोर जिचकार यांच्या नावाची शिफारस गटनेते तानाजी वनवे यांनी केली. आज सभागृहात काँग्रेस स्वीकृत सदस्यपदावर चांगलाच खल झाला. मनपा सचिवांनी कोणत्या गटनेत्यांचे पत्र  ग्राह्य धरावे, याबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. विभागीय आयुक्तांनी गटनेतेपदी तानाजी वनवे यांना मान्यता दिली असली तर गटनेत्यांचा वाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस सदस्यपदाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घ्यावा, असे सचिवांनी सांगितले. यावर कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी तानाजी वनवे गटनेतेपदी नियुक्ती झाल्याचे १९ मेचे निर्देश आहेत. मात्र, नामनिर्देशित सदस्याच्या नामांकनाची प्रक्रिया १८ मे रोजी पार पडली. आता प्रकरण न्यायालयात आहे, असे नमूद करीत भाजपच्या स्वीकृत सदस्याची घोषणा केली. सभागृहाचा एजेंडा २४ तारखेला काढण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रियेची भर त्यानंतर पडली. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर सल्लागाराचे मत घ्यावे, असे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सुचविले. तोपर्यंत भाजपच्या स्वीकृत सदस्यांची घोषणा करावी, अशी मागणी केली.

अग्रवाल, पोकुलवार, वानखेडे, गांधी स्वीकृत सदस्य
भाजपने माजी उपमहापौर सुनील अग्रवाल, मुन्ना पोकुलवार, दक्षिण-पश्‍चिममधील किशोर  वानखेडे तसेच निशांत गांधी यांच्या नावाचे नामांकन दाखल केले होते. कार्यकारी महापौर  दीपराज पार्डीकर यांनी चारही जणांच्या स्वीकृत सदस्यपदाची सभागृहात घोषणा केली.

Web Title: nagpur news congress nagpur municipal corporation