परीक्षा भवनाला येणार ‘कॉर्पोरेट’ लुक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची घडी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी चांगलीच वळणावर आणली आहे. आता परीक्षा भवनाला ‘कॉर्पोरेट’ लुक देण्यात येणार असून, संपूर्ण कक्षच वातानुकूलित करण्यात येईल. जवळपास तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, मूल्यांकन विभागाच्या संपूर्ण कक्षाचा ‘मेकओव्हर’ करण्यात येणार आहे.  

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अनेक नवनवे प्रयोग केले जात आहेत. आयटी रिफार्मच्या दिशेने आवश्‍यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. परीक्षेचे विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी ऑनस्क्रीन मूल्यांकनास ऑनलाइन मूल्यांकनासह ‘ई पेपर डिलिव्हरी’चा यशस्वी प्रयोग  विद्यापीठाने केला. याचाच परिणाम म्हणून परीक्षांसह निकाल वेळेवर लागण्यास सुरुवात झाली. शिवाय उन्हाळी आणि हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक ताळ्यावर आले. शिवाय फेरमूल्यांकनाच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले. मात्र, परीक्षा भवनात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी  आणि संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना इमारतीमधील दुरवस्था आणि जिकडेतिकडे कचराच असल्याचे चित्र दिसून येते. अनेकदा येथील अव्यवस्था आणि अस्वच्छता हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच विद्यापीठाने विभागात कॉर्पोरेट विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू केले. आता या इमारतीत असलेल्या विविध कक्षांना कॉर्पोरेट लुक देण्यात येणार आहे. 

याचे काम सुरू झाले असून परीक्षक, मॉडरेटर आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी खासगी कक्ष देण्यात येणार आहे. मूल्यांकन करताना कुठल्याही परीक्षकाला त्रास व्हायला नको म्हणून त्याला स्वतंत्र असे कक्षच देण्यात येणार आहे. तसेच उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिवांसाठी ‘कॅबिन’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय अधीक्षक आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी कार्पोरेट पद्धतीचे कक्ष देण्यात येणार आहेत. याचे काम काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात परीक्षा विभाग नव्या लुकमध्ये दिसणार आहे. परीक्षक आणि मॉडरेटरला एका कार्पोरेट पद्धतीचे कार्यालय मिळणार हे विशेष.

Web Title: nagpur news corporate look to exam center