नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नागपूर - बिल्डर राहुल नागुलवार यांच्या पत्नी पल्लवी (३५, रा. मॅजिस्टिक हिल) यांच्या आत्महत्येप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी नगरसेवक संजय महाकाळकर, बिल्डर अविनाश घुसे त्यांच्या पत्नी हर्षा यांच्यासह सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राकेश तिडके, संजय गिल्लुरकर, पंकज पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत. पल्लवी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी सदर गुन्हा दाखल केला.

पल्लवी यांचे पती राहुल हे बिल्डर आहेत. गुरुवारी रात्री पल्लवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. मी आरोपींच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. महाकाळकर यांच्यासह सहाजण माझ्या आत्महत्येस जबाबदार आहेत, असे पल्लवी यांनी चिठ्ठीत लिहिले होते. त्याआधारे अंबाझरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला, अशी माहिती अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी दिली.

Web Title: nagpur news corporator vidarbha