सोने लुटारू जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागपूर - सराफा व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून २६ लाख रुपयांचे सोने लुटणाऱ्या दोन्ही आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोने आणि रोख रक्‍कम पोलिसांनी हस्तगत केली. आकाश मिलिंद इंदूरकर (वय २०, रा. आनंदनगर) आणि राहुल राजू निमजे (वय २९, रा. इंदिरामातानगर) अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती डीसीपी राहुल माकणीकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

नागपूर - सराफा व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून २६ लाख रुपयांचे सोने लुटणाऱ्या दोन्ही आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोने आणि रोख रक्‍कम पोलिसांनी हस्तगत केली. आकाश मिलिंद इंदूरकर (वय २०, रा. आनंदनगर) आणि राहुल राजू निमजे (वय २९, रा. इंदिरामातानगर) अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती डीसीपी राहुल माकणीकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

सराफा व्यापारी बंडूजी पांडुरंग कुंभारे (रा. वैशालीनगर) हे मंगळवारी दुपारी बारा वाजता दुचाकीने घराच्या अगदी एका किमी अंतरावर असलेल्या सराफा दुकानात दागिने घेऊन होते. दरम्यान, त्यांच्या मागावर असलेल्या आकाश आणि राहुल या दोघांनी कुंभारे यांची दुचाकी अडवली. त्यांना खाली पाडून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. त्यांना बॅटने मारहाण करून त्यांच्याकडील २४ लाख रुपये किमतीचे ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ लाख रुपये किमतीचे ११ किलो चांदीचे दागिने हिसकावून पळून गेले. त्यांनी दुचाकी कळमन्यातील सूर्यनगरात नेली. तेथे दुचाकीतील सोन्याचे दागिने काढले. त्यापैकी चांदीचे दागिने फेकून दिले आणि दुचाकी तेथेच ठेवून पळ काढला. या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी कुंभारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

पाचपावली पोलिसांनी चार पथके तयार केली. परिसरातील काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, लुटारू सापडत नव्हते. रात्रीच्या सुमारास सूर्यनगरात दुचाकी आणि चांदीचे दागिने सापडल्यामुळे पोलिसांना नागपुरातील चोर असल्याचा सुगावा लागला. दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आठ दिवसांपासून ‘रेकी’ 
आकाश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, राहुलला त्याने भागीदार केले होते. या दोघांनी कुंभारे यांच्या दैनंदिनीवर पाळत ठेवली. घरी येण्याची आणि जाण्याच्या वेळेवर लक्ष ठेवले. कुणीही सोबत नसल्याचे अचूक हेरले. त्यासाठी ते रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सलग आठ दिवस नाश्‍ता करण्यासाठी आले. त्यानंतर एनआयटीच्या खुल्या जागेवर क्रिकेट खेळण्याची कल्पना दोघांना सुचली. गेल्या दोन दिवसांपासून ते क्रिकेट खेळत होते. त्यामुळे कुणालाही संशय आला नाही.

फेसबुकवरून शोध
सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडे आले होते. त्यामध्ये एका आरोपीच्या डोक्‍यावरील केसाची रचना विशिष्ट स्वरूपाची होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात फोटो पाठवून चौकशी केली. एका युवकाने राहुल निमजे असू शकतो, अशी माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्या फेसबुक अकाउंटवरून त्याचा प्रोफाईल फोटो काढला. तो फुटेजमधील चित्राशी साधर्म्य साधत होता. त्यानंतर राहुलच्या घराचा पत्ता काढला असता तो सकाळपासून बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याचा मित्र कोण? याबाबत चौकशी केली असता कुख्यात आकाशचे नाव समोर आले.

जेल परिसरातून आरोपींना अटक 
आकाश आणि राहुल या दोघांचा बोरकर नावाचा मित्र आज मध्यवर्ती कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर येणार होता. त्याला भेटायला हे दोघे जाणार होते, अशी टीप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मध्यवर्ती कारागृह परिसरात दोघेही बोरकरला भेटायला आले. बोरकर जेलबाहेर येताच आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Web Title: nagpur news crime