बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाची विक्री 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारावर भूखंडाची विक्री केल्याचे प्रकरण गिट्टीखदान ठाण्यांतर्गत उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बिल्डर श्रीकांत काशीनाथ ओक (55, रा. सुरेंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवित राजेश रामचंद्र हांडेला (52, रा. तुकडोजी पुतळा चौक) अटक केली. 

नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारावर भूखंडाची विक्री केल्याचे प्रकरण गिट्टीखदान ठाण्यांतर्गत उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बिल्डर श्रीकांत काशीनाथ ओक (55, रा. सुरेंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवित राजेश रामचंद्र हांडेला (52, रा. तुकडोजी पुतळा चौक) अटक केली. 

बिलासपूर येथील एम. भास्करन चाटू यांचे दाभाच्या आकांक्षी सोसायटीमध्ये दोन भूखंड होते. त्यांनी 29 जानेवारी 2013 ला भारतीय लोककल्याण सोसायटी, मनीषनगर येथील विजय संतलाल बहल (54) यांना दोन्ही प्लॉट विकले. विजयने सामान्य मुख्त्यार पत्राच्या आधारावर 25 एप्रिल 2013 ला दोन्ही प्लॉट अंधेरी, मुंबई येथील नरेंद्र चाचडा यांना विकले. नरेंद्रने 26 फेब्रुवारी 2017 ला दोन्ही भूखंड श्रीकांत ओकला विकले. 

बांधकाम सुरू करण्यासाठी ओक यांनी बॅंकेत कर्जासाठी अर्ज केला. बॅंकेने प्रॉपर्टीचा सर्व अहवाल काढला असता दोन्ही भूखंड 18 डिसेंबर 2014 मध्ये बजाजनगर येथील भावना भूषण डवले नावाच्या महिलेला विक्री केल्याचे समजले. एम. भास्करनने हे भूखंड विक्री केल्याचे समोर आले. मात्र, भास्करन आणि बहल दरम्यान सामान्य मुख्त्यार पत्र आणि भावनाच्या नावावर केलेले सामान्य मुख्त्यार पत्रावर केलेली भास्करनची सही आणि फोटो वेग-वेगळे होते. ओक यांनी याबाबत एसआयटीकडे तक्रार दाखल केली. 

फरार आरोपींमध्ये एनआयटी कॉम्प्लेक्‍स, आवळे बाबू चौक येथील पंकज कृष्णा सोनूमनम आणि अज्ञात युवकाचा समावेश आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी 
भावनाच्या नावावर असलेले सामान्य मुख्त्यार पत्र बनावट असल्याची माहिती समोर आली. यामध्ये साक्षिदार राजेश हांडे, पंकज सोनूमनम आणि अज्ञात आरोपी होता. तिघांची चौकशी केली असता फसवणूक समोर आली. पोलिसांनी शनिवारी राजेशला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. राजेश आणि पंकज यांनी मिळून प्रॉपर्टीचे बनावट कागदपत्र तयार केले आणि भास्करनच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून भावनाला भूखंड विकला. 

Web Title: nagpur news crime