रेल्वेस्थानकावरून चोरट्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नागपूर- लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेस्थानकावर गस्तीदरम्यान संशयाच्या आधारे चोरटा बबलू परशुराम ठाकूर (३२, रा. बरेली, मध्य प्रदेश) याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

बुटीबोरी येथील लोमशानाथ विश्‍वकर्मा हे रविवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकाच्या पार्किंग परिसरात झोपले होते. बबलूने त्यांच्या पॅंटच्या खिशांतील मोबाईल व एक हजार रुपये रोख काढले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लोहमार्ग पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेले. संशयास्पद हालचाली असल्याने ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. 

जाग येताच विश्‍वकर्मा यांना मोबाईल आणि खिशातील पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याला पकडल्याची चर्चा त्याच्यापर्यंत पोहोचली. त्याने लोहमार्ग ठाणे गाठून जप्त केलेला मोबाईल बघताच आपला असल्याचे सांगितले. विश्‍वकर्मा यांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याला अटक केली. याचप्रमाणे संपर्कक्रांती एक्‍स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. मध्य प्रदेशातील शिवनी येथील रहिवासी दीपक ठाकूर हे संपर्कक्रांती एक्‍स्प्रेसच्या जनरल डब्यातून भोपाळ ते नागपूर स्थानकावर प्रवास करीत होते. ते झोपेत असताना चोरट्याने त्यांच्या खिशातील १७ हजार ६०० रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. नागपूर स्थानकावर उतरल्यानंतर लोहमार्ग ठाणे गाठून तक्रार दिली. लोहमार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्याचा तपास सुरू केला आहे.

Web Title: nagpur news crime