कोट्यवधींचे दागिने लुटण्याचा डाव फसला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

नागपूर - सुशिक्षित असलेल्या एका महिलेजवळून बहीण व वडिलाचा मृत्यू होण्याची भीती दाखवून जवळपास सव्वातीन लाख रुपये लुटणाऱ्या पाच मांत्रिकांची मोठी योजना फसली. मांत्रिकांनी महिलेला घरातील सर्व दागिन्यांची पूजा करून शुद्धी करण्यासाठी आणून देण्यास सांगितले होते. मांत्रिकांच्या सांगण्याप्रमाणे महिलेने तशी तयारीसुद्धा केली होती. मात्र, बहिणीला संशय आल्याने दागिन्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मांत्रिक सोने लुटून पसार होण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्यामुळे सतर्कता बाळगण्यात आली. महिलेने सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

नागपूर - सुशिक्षित असलेल्या एका महिलेजवळून बहीण व वडिलाचा मृत्यू होण्याची भीती दाखवून जवळपास सव्वातीन लाख रुपये लुटणाऱ्या पाच मांत्रिकांची मोठी योजना फसली. मांत्रिकांनी महिलेला घरातील सर्व दागिन्यांची पूजा करून शुद्धी करण्यासाठी आणून देण्यास सांगितले होते. मांत्रिकांच्या सांगण्याप्रमाणे महिलेने तशी तयारीसुद्धा केली होती. मात्र, बहिणीला संशय आल्याने दागिन्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मांत्रिक सोने लुटून पसार होण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्यामुळे सतर्कता बाळगण्यात आली. महिलेने सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन मांत्रिकांना अटक केली असून उर्वरित तीन मांत्रिकांचा शोध पोलिस घेत आहेत.

चिटणवीस ले-आउट येथे राहणाऱ्या रूपा चिटणवीस यांना कालीमातेची पूजा केल्यास घरावर येणारी सर्व संकटे दूर होत असल्याची  बतावणी करून मांत्रिकाशी संगनमत करून लुबाडण्याची योजना त्यांचा ड्रायव्हर राजेश चटकेने आखली होती. रूपा यांचा विश्‍वास संपादन करून त्यांना तीन लाख २० हजार रुपयांनी लुबाडले होते. चंद्रपुरातील कालीमातेच्या पूजेसाठी पाच हजार रुपये ड्रायव्हर राजेश चटकेला दिल्यानंतर राजेशला लालच सुटली. त्याने काशिनाथ  पंडितच्या मंत्रांच्या उपचाराने बहिणीचा आजार दूर करण्याचे सांगून पूजेसाठी हट्ट धरत भीती दाखवली. त्यामुळे रूपा चिटणवीस यांनी काशिनाथ पंडितला ५१ हजार रुपये दक्षिणा दिली. त्यानंतर त्याने लिहून दिलेली आयुर्वेदिक औषधी घेण्यासाठी ड्रायव्हर राजेशने भाग पाडले. आयुर्वेदिक दुकानातील विजय माटे आणि अर्जुन गोसावी यांच्याशी संगनमत करून दहा रुपयांची भुकटी ही दैवी असल्याचे सांगत तब्बल ६१ हजार रुपयांत दिली. अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारची मनात भीती घालून रूपा यांच्याकडून सव्वातीन लाख उकळल्यानंतर कोटींचे सोने लुबाडण्याचा डाव पाचही मांत्रिकांनी आखला होता. मात्र, वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे आरोपींचा डाव फसला.

Web Title: nagpur news crime

टॅग्स