ठाणेदाराच्या रायटरला  लाच घेताना अटक

ठाणेदाराच्या रायटरला  लाच घेताना अटक

नागपूर - न्यायालयात दोषारोपपत्र सादर न करता थेट ‘बी’ फायनल रिपोर्ट पाठवून प्रकरण निस्तारण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तसेच १० हजारांचा पहिला हप्ता घेतल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पीआय रायटर हवालदार मोतीराम दशरथ शिंदे याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे पोलिस विभागातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

मोतीराम शिंदे हे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या  पोलिस निरीक्षकांचे रायटर आहेत. साहेबांचे नाव समोर करून तो लाचेची मागणी करीत होता. आज रायटरलाच एसीबीने अटक केल्याने तेथील पीआय चांगलेच अडचणीत आले असून त्यांचीही या प्रकरणी चौकशी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

तक्रारदार हे मोहाडी तालुक्‍यातील (जि. भंडारा) येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसांत अप क्र. २१२८/१६ कलम ३६६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पीआय रायटर असल्याने लाचखोर शिंदे यांनी न्यायालायात दोषारोपपत्र सादर न करता प्रकरण थेट फायनल करून तसा रिपोर्ट पाठविण्याकरिता तक्रारदाराला २५ हजारांची लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराला लाच रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले.

एसीबीने तक्रारीची खातरजमा करून आज सापळा रचला. त्यानुसार, तक्रारदाराने लाच रकमेत सौदेबाजी केली असता पहिला हप्ता १० हजार रुपयांची त्याने मागणी केली. हाच पहिला १० हजारांचा हप्ता घेत असताना एसीबीच्या पथकाने लाचखोर शिंदेला रंगेहात अटक करून त्याच्या मुसक्‍या आवळल्या. ही कारवाई एसीबीप्रमुख पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दिनकर सावरकर, निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलिस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, शेखर देशकर, चालक शिपाई अमोल खरात यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com