रत्नमालाचा खुनी मंगलची "सुपारी'? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

खापरखेडा / पारशिवनी - रत्नमाला रांगणकर हिचा खून करणाऱ्या मंगल बागडे याला काही युवकांनी मारहाण केली. यामुळेच मंगलने रत्नमालाचा जीव घेतला. अटक झाल्यानंतर आरोपी मंगलने मारहाण करणारे सुपारी दिल्याची भाषा बोलत होते, अशी माहिती दिली. यामुळे मंगलची सुपारी दिली कुणी, याचा शोध लावणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. 

खापरखेडा / पारशिवनी - रत्नमाला रांगणकर हिचा खून करणाऱ्या मंगल बागडे याला काही युवकांनी मारहाण केली. यामुळेच मंगलने रत्नमालाचा जीव घेतला. अटक झाल्यानंतर आरोपी मंगलने मारहाण करणारे सुपारी दिल्याची भाषा बोलत होते, अशी माहिती दिली. यामुळे मंगलची सुपारी दिली कुणी, याचा शोध लावणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. 

आरोपी मंगल नजीकच्या साहोली येथे राहतो. शिक्षणासाठी गावाबाहेर जात असताना त्याची रत्नमालाशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कोळसा खाणीसाठी जमीन अधिग्रहणाचा मोबदला म्हणून वेकोलिने नोकरी देऊ केली. तीन बहिणीत मोठ्या असलेल्या रत्नमाला हिने नोकरी स्वीकारली. मंगल तिला वेळोवेळी मदत करतच होता. दरम्यान, मंगलने रत्नमालाकडे लग्नासाठी तगादा लावला. रत्नमालाच्या कुटुंबीयांना हे मान्य नसल्याने मंगलविरुद्ध 16 फेब्रुवारी रोजी रत्नमालाच्या अपहरणाची तक्रार खापरखेडा पोलिसात केली. रत्नमालाचे माझ्यावर प्रेम असल्याचे पुरावे मंगलने दिले. पोलिसांनी समजूत घालून एकमेकांना भेटू नये, असा सल्ला दिला. दोघांनी एकमेकांना भेटू नये, असे कागदोपत्री लिहून घेतले. 

मात्र, अचानक शुक्रवारी आरोपी मंगल यास काही युवकांनी मारहाण केली. शनिवारी मंगलने रत्नमालाचा खून केला. घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपीला खापा-पाटणसावंगी मार्गावर खापरखेडा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर मंगलने तपशील देताना "आम्ही तुझा पंधरा दिवसांपासून शोध घेत होतो. तुझी सुपारी मिळाली आहे' असे मारहाण करणारे म्हणत होते असे सांगितले. यामुळे या घटनेला दुसरे वळण मिळाले आहे. खापरखेडा पोलिसांनी मारहाणीच्या संशयात भानेगावच्या दोन युवकांना ताब्यात घेतले. एकूण सहा जणामंध्ये दोन मुले सिंगोरीची तर अन्य दोघे गिट्टीखदान नागपूर येथील असल्याचे सांगण्यात आले. मारहाण करणारे दोन युवक काही दिवसांपूर्वी कारागृहातून परतले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

शहराशी जवळीक मुलींच्या जिवावर 
कन्हान नदीकाठचे सिंगोरी हे दुर्गम खेडे म्हणून ओळखले जात होते. पावसाळ्यात चार महिने या गावात पोहोचणेही कठीण. नदीवर पूल झाला अन्‌ शहराशी जवळीक झाली. आमच्या गावातील दोन लेकीचा जीव यात गेला, असे मत गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत. चार वर्षांपूर्वी येथील प्रियंका रांगणकर हिचा खून झाला होता. आता रत्नमालाचा जीवही तसाच गेला, असेही मतही व्यक्त केले. घटना गावकऱ्यांच्या कानी पडताच गावात शोककळा पसरली. 

Web Title: nagpur news crime Murder love affair vidarbha