साहेब...माझी बायको प्रियकरासोबत पळाली हो...! 

अनिल कांबळे
बुधवार, 27 जून 2018

नागपूर - साहेब.. माझी बायको प्रियकरासोबत पळून गेली... प्लिझ मला मदत करा...माझी बायको मला परत आणून द्या...मी तिच्यावर खूप प्रेम करतो...तिच्या प्रियकराला समजावून सांगा...मी तिच्याशिवाय नाही जगू शकत...माझी बायको जर परत मिळाली नाही, तर मी पोलिस ठाण्यातूनच जाणार नाही, ही एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून एका युवकाने अशी भूमिका घेतली. सध्या त्याने पोलिस ठाण्यात ठाण मांडले असून पोलिसही संभ्रमात पडले. पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला पाणी पाजले आणि काय प्रकार झाला ते विचारले. काही वेळाने प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंद केली. 

धंतोलीत राहणाऱ्या सुनीत (वय 30, बदललेले नाव) हा किराणा दुकानदार आहे. त्याचा प्रांजलशी (वय 26) सात वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती तासनतास मोबाईलवर कुणाशीतरी बोलत होती. 20 जूनला सायंकाळी पाच वाजता ती हॉस्पिटलमध्ये जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. परंतु घरी परतली नाही. त्यामुळे सुनीत काळजीत पडला. त्याने वारंवार तिच्या मोबाईलवर कॉले केले, परंतु तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. घाबरलेल्या सुनीतने शोधाशोध केली परंतु ती मिळून आली नाही. शेवटी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

प्रियकराने लावली फूस 
विक्‍की (वय 30, रा. स्नेहलनगर) आणि प्रांजल हिचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांना लग्न करायचे होते. परंतु दोन मुले आणि पती असल्याने अडचणी होत्या. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. 

गुन्हा दाखल 
पत्नीने ने बॉयफ्रेंडसोबत पळ काढल्यानंतर सुनीतने धंतोली तक्रार दिली. लग्नाचे आमिष दाखवून पत्नीला पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नीला पळवून नेणाऱ्या प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल केला. 

लोकेशन मध्यप्रदेशातील लॉज 
प्रांजल आणि विकी यांची फेसबूकवरून मैत्री झाली होती. त्यानंतर प्रेमसंबंध जुळले. 20 जूनला रात्री दोघांनी थेट मध्यप्रदेश गाठले. पारस येथील लॉजवर त्या दोघांचे मोबाईल लोकेशन निघाले. पत्नीचा पत्ता लागल्यामुळे सुनीत समाधानी होता. मात्र, प्रांजल परत येण्यास तयार नव्हती. त्यामुळे पोलिसांसमोर पुन्हा पेच पडला आहे. 

Web Title: nagpur news crime My wife run away with lover