तोतयांची टोळी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नागपूर - सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करून व्यापारी, दुकानदार आणि काही अवैध कारभार करणाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीला जरीपटका पोलिसांनी सापळा रचून अटक केली. 

भन्ते शंकर अमिरत चौधरी बौद्ध भिक्‍खू असून, पुण्यातील दौंड तालुक्‍यातील पारस येथील शांती बुद्धविहारात बौद्ध धम्म प्रसारक म्हणून कार्यरत आहेत. २० डिसेंबरपासून बौद्ध धम्माच्या प्रसार-प्रचारासाठी नागपुरातील पिवळी नदी परिसरात असलेल्या  

धम्मक्रांती बुद्धविहारात थांबले होते. रविवारी दुपारी विहारात तीन युवक आले. त्यांनी सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करून ‘तुम्ही बांगलादेशातील नागरिक आहात. तुम्हाला अटक करावी लागेल. कारवाई टाळायची असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागेल. अन्यथा बेड्या ठोकू,’ अशी धमकी दिली. भन्ते शंकर यांनी भारतीय नागरिक असल्याचे सांगत शासनमान्य कागदपत्रे आणि ओळखपत्र दाखवले. आरोपींनी त्यांची कागदपत्रे ताब्यात घेऊन एटीएम कार्डने पैसे काढून देण्यास सांगितले. त्यामुळे सहकारी भन्ते शुभ यांना  त्या तोतया पोलिसांसोबत ऑटोने पाठवले. राणी दुर्गावती चौकातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून २० हजार रुपये काढले. तसेच सहकाऱ्याच्या खात्यातून १५ हजार रुपये असे ३५ हजार रुपये काढले. ते पैसे घेऊन आरोपींनी त्यांना पुन्हा विहारात सोडून दिले. भन्ते शंकर यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

१२ तासांत आरोपी अटकेत
भन्ते शंकर यांनी तक्रार करताच पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. एटीएमवरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. त्यानंतर आरोपींचा शोध घेतला. १२ तासांत गुन्हा उघडकीस आणत आरोपी सूरज सुभाष नागदिवे (घोरपड, ता. कामठी), अभिषेक संजय शेलारे (रा. यशोधरानगर) आणि बंटी या तिघांना अटक केली. ही टोळी गेल्या वर्षभरापासून कार्यरत होती. अनेकांना सीबीआय पोलिस असल्याची बतावणी करून लुटल्याची कबुली आरोपींनी दिली.

Web Title: nagpur news crime police