प्रेयसीवर बलात्कार करून पाजले विष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नागपूर - तीन वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या युवकासोबत विवाहितेचे प्रेमसंबंध असल्याची कुणकूण कुटुंबीयांना लागली. पतीने पत्नीची समजूत घातली, तर युवकाच्या पत्नीने दुर्लक्ष केल्याने दोन्ही कुटुंबीय सुखरूप जीवन जगू लागले होते. त्यांचे प्रेम पुन्हा उफाळले. महिला युवकाच्या घरी गेली. शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर वाद झाला. त्यामुळे युवकाने तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीच्या पाठोपाठ पती युवकाच्या घरी गेला. पत्नीला त्याने रुग्णालयात नेले. पतीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी नंदू उईकेला (३०, रा. गिट्टीखदान) अटक केली.

नंदू हा पेंटर असून, त्याच्या घराशेजारी ३४ वर्षीय महिला राहते. तिला दोन मुले व मुलगी आहे. तिचा पती हातमजुरी करून रात्री दारू प्राशन करून घरी येतो. तिचे अविवाहित नंदूशी सूत जुळले. प्रेमसंबंध सुरू असताना नंदूचे लग्न झाले. त्याला मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी प्रेमप्रकरणाला वाचा फुटल्यामुळे नंदूने काढता पाय घेतला. त्याने तिला संबंध ठेवण्यास नकार दिला. संधी साधून ती नंदूच्या घरी येत होती.

शुक्रवारी दुपारी एक वाजता ती नंदूच्या घरात गेली. दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वाद झाला. त्यामुळे नंदूने तिला मारहाण केली आणि विषारी पदार्थ खाऊ घातले. पतीही नंदूच्या घरी पोहोचला असता ती अत्यवस्थ अवस्थेत दिसली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालानंतर डॉक्‍टरांनी स्पष्ट केले. 

दोघांचा प्रेमविवाह
पीडित ३४ वर्षीय महिला हातमजुरी करीत असताना बांधकामावरील मजूर असलेल्या युवकाशी ओळख झाली. दोघांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला. नागपुरातील गिट्टीखदान परिसरात संसार थाटला. त्यानंतही तिच्या आयुष्यात नंदू आला. विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा सध्या तिच्या जीवनाशी संघर्ष सुरू आहे. तिच्यावर उपचार सुरू असून, मृत्यूशी झुंज देत आहे.

Web Title: nagpur news crime rape case