पाऊस कमी, मात्र पीक परिस्थिती उत्तम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नागपूर - यंदा मॉन्सूनने जिल्ह्याला चांगलाच हिसका दाखवला. नियमित तर नाहीच सरासरी एवढाही पाऊस पडला नाही. यामुळे पिण्याचे पाण्याचे संकट निर्माण झाले. मात्र, जो पाऊस पडला तो पीकपाण्यासाठी चांगला मानला जात आहे. शेतकऱ्यांना हे पटत नसले तरी यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पिकांचे चांगले उत्पादन होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. तसा अहवालसुद्धा महसूल विभागाने राज्य शासनास पाठविण्यात आला आहे.

पीक परिस्थितीचा अहवाल तयार करण्याबाबत शासनाकडून नवीन निकष निश्‍चित करण्यात आले आहे. यात पावसाची टक्केवारी महत्त्वाचा घटक आहे. पावसाशिवायही अन्य घटकांचा विचार करून दुष्काळी परिस्थितीचा निष्कर्ष काढला जातो. पूर्वी पैसेवारीच्या आधारे दुष्काळी गावे निश्‍चित करण्यात येत होती. ५० पैसेपेक्षा कमी उत्पादन असलेली गावे दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात येत होता. 

आता मात्र नवीन निकष निश्‍चित करण्यात आले. केंद्राच्या सूचनेनुसार नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. या नुसार सर्वेक्षण करून ३० ऑक्‍टोबरचा अहवाल शासनाकडून पाठविण्यात आला. यात जिल्ह्यातील एकाही गावात दुष्काळी परिस्थिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात कामठीसह काही तालुक्‍यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झाले. धान, कापूस पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे त्यांचे नुकसान झाले. असे असतानाही प्रशासनाकडून पीक परिस्थिती चांगला असल्याचा अहवाल पाठविण्यात आला. 

पाणी आरक्षित करण्याचे निर्देश
यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात जोरदार वृष्टी झाली नाही. हलक्‍या सरींचा पाऊस पडला. असा पाऊस पीकपाण्यासाठी चांगला मानले जातो. परतीच्या पावसाने काही गावांचा अपवाद वगळता इतरांना झटका दिला नाही. यामुळे यंदा जलाशयेसुद्धा भरलेले नाही. नागपूरला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पेंच धरणातही फारसे पाणी नाही. उन्हाळ्यात उद्‌भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता आतापासूनच पाणी आरक्षित करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच दिले. महापालिकेनेसुद्धा पाणी कपातीबाबत सूतोवाच केले आहे. त्यानुसार नियोजन करण्याचे आदेश दिले आहे.

Web Title: nagpur news crop rain agriculture