बापाकडून मुलीचे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

नागपूर - पत्नी घरी नसताना अल्पवयीन मुलीवर चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी बापास पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीचे वय १४ वर्षे आहे.  

नागपूर - पत्नी घरी नसताना अल्पवयीन मुलीवर चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी बापास पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीचे वय १४ वर्षे आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदानमधील किशोर (वय ४५) पत्नी व मुलीसह राहतो.  तो एका शाळेत कार्यरत आहे, तर पत्नी रामदासपेठेतील रुग्णालयात नर्स आहे. संसार वेलीवर नितू (बदललेले नाव) मुलीच्या रूपात फूल उमलले. मुलगी सहा वर्षांची असताना बापाची मुलीच्या शरीरावर वासनांध नजर गेली. पत्नी घरी नसल्याची संधी बघून मुलीशी अश्‍लील चाळे केले. तिने प्रतिकार केला असता बळजबरी केली. २० जानेवारी २०१३ रोजी तिच्यावर बळजबरी लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मुलीने सायंकाळी घरी आलेल्या आईला हकिकत सांगितली. पतीकडून घटनेची खातरजमा करण्यासाठी पतीला विचारणा केली. मात्र, त्याने स्पष्ट नकार देत मुलगी खोटे बोलत असल्याचे सांगितले. तेव्हापासून किशोरने मुलीवर अत्याचार करणे सुरू केले.

शिक्षिकेने फोडली वाचा
नितू ही सध्या नवव्या वर्गात शिकते. मात्र, ती एकलकोंडी असल्यामुळे तिच्या मैत्रिणींना संशय आला. त्यांनी खोदून विचारल्यानंतर बापाने केलेल्या कृत्याबाबत सांगितले. त्या मुलींनी नितूला वर्गशिक्षिकेकडे नेले आणि हकिकत सांगितली. शिक्षिकेने तिच्या आईची भेट घेऊन प्रकाराला  वाचा फोडली. 

Web Title: nagpur news daughter sexual abuse by father