दीक्षाभूमीला मिळणार १०० कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नागपूर - दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ असून, लाखो भाविक भेट देण्यासाठी येतात. हे पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० कोटींचा प्रस्ताव तयार केला असून, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रस्तावाला शिखर समितीने मान्यता दिली. मुंबईत विधानभवनात मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिखर समितीची बैठक झाली.

नागपूर - दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ असून, लाखो भाविक भेट देण्यासाठी येतात. हे पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० कोटींचा प्रस्ताव तयार केला असून, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रस्तावाला शिखर समितीने मान्यता दिली. मुंबईत विधानभवनात मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिखर समितीची बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, आमदार नाना श्‍यामकुळे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गजघाटे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे, मुख्य सचिव सुमित मलिक, नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नितीन करीर, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसकर आदी उपस्थित होते. बैठकीत दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण व नागरी सुविधा उपलब्धतेबाबत सादरीकरण करण्यात आले. सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी डिझाइन असोसिएट्‌स इन्कॉर्पोरेशन नोएडा यांची सल्लागार वास्तुविशारद म्हणून नियुक्ती झाली आहे. 

कंपनीने डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या २२.४ एकर जागेवरील प्रकल्पाचा विकास आराखडा तयार केला. यात व्यासपीठ, दगडी सुरक्षाभिंतीचे बांधकाम, सुरक्षारक्षक, पहारेकरी खोली, टेहळणी मनोरा, प्रवेशद्वार, नियंत्रण कक्ष, अनामत कक्ष, प्रथमोपचार कक्ष, संग्रहालय, अर्थकेंद्र, व्यावसायिक संकुल, खुले सभागृह, दगडी परिक्रमा, दगडी पदपथ, विद्युतीकरण, सौरऊर्जा यंत्रणा, मुख्य स्तूपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण, ऑडिओ सिस्टिम आदींचा समावेश आहे.

Web Title: nagpur news Dikshabhoomi