दहा दिव्यांगांना थेट नोकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

नागपूर - आपले सरकार केंद्रामार्फत दिव्यांग कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा रोजगार मेळावा जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. परीक्षेनंतर दहा उमेदवारांना थेट नोकरीचे ‘ऑफर लेटर’ देण्यात आले.  

रोजगार मेळाव्याला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर, एनआयसीचे त्रिपाठी, महिंद्रा फायनान्सच्या तनुश्री, ई-गव्हर्नन्सचे प्रदेश व्यवस्थापन विनय पहेलाजानी, उमेश मानमोडे, प्रशांत झाडे उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित उमेदवारांना प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता मिशनबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाण ‘भिम’ ॲपच्या वापरासंदर्भातही माहिती देण्यात आली. या मेळाव्यात जवळपास १२० दिव्यांगांनी सहभाग घेतला होता. महिंद्रा फायनान्स कंपनीकडून ३० उमेदवारांची परीक्षा घेतली. यातील १० लोकांना नोकरीचे लेटर देण्यात आले.

Web Title: nagpur news Direct job to ten handicap