डॉक्‍टरांचा लेखणीबंद सत्याग्रह यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - वैद्यकीय समुपदेशन रद्द करण्यासाठी शासनच पुढाकार घेत आहे. नेक्‍स्ट  परीक्षाचा विरोध तसेच आधुनिक औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचा अधिकार केवळ एमबीबीएस आणि बीडीएस डॉक्‍टरांचा आहे, अशा विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी इंडियन  मेडिकल असोसिएशनतर्फे खासगी वैद्यकीय सेवेतील डॉक्‍टरांनी मंगळवारी प्रिस्क्रिप्शन न लिहिण्याचा सत्याग्रह पुकारला. दुपारी दोन वाजेपर्यंत एकाही डॉक्‍टरने प्रिस्क्रिप्शन लिहिले नसल्याचा दावा आयएमएतर्फे करण्यात आला.

विशेष असे की, देशभरात आयएमएतर्फे हा सत्याग्रह पुकारण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. के. के. अग्रवाल यांनी केले. राज्याचे नेतृत्व डॉ. वाय. एस. देशपांडे  यांनी केले. स्थानिक पातळीवर नागपूर आयएमए शाखेतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावर मोठ्या  प्रमाणात लोकांना बोलविण्यात आले. त्यांना डॉक्‍टरांच्या या लेखणीबंद आंदोलनाची माहिती दिली. विशेष असे की, डॉ. संजय देशपांडे व डॉ. आशीष दिसावाल यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्‍टरांची सभा घेतली. मेडिकलमध्येही आज प्रिस्क्रिप्शन लिहिले नाही. येथील डॉक्‍टरांवर सातत्याने होणारे हल्ले तसेच इतर मागण्यांसंदर्भात जनजागरण करण्यात आले. डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. प्रशांत राठी यांच्यासह शेकडो डॉक्‍टर या सत्याग्रहात सामील झाले. 

Web Title: nagpur news doctor