डॉक्‍टरचा परिचारिकेवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

नागपूर - हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सला गुंगीचे औषध देऊन डॉक्‍टरने तिच्यावर अत्याचार केला. अंतरंगाचे फोटो आणि व्हिडीओ तयार करून तिला इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपी डॉक्‍टरविरूद्ध नर्सच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉ. शेखर उर्फ सेवानंद सूर्यभान तायडे (वय 35, रा. लोकमान्य नगर, हिंगणा रोड) असे अटक केलेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. 

पीडित नर्स डॉली (बदललेले नाव) ही मूळची वर्धा येथील. तिने नागपुरात नर्सींग ट्रेनिंग केले आणि बजाजनगरातील एका नामांकित हॉस्पिटललध्ये नोकरी मिळवली. गेल्या सहा महिन्यापासून ती हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. त्याच हॉस्पिटलमध्ये आरोपी डॉक्‍टर शेखर हा सुद्धा नोकरीवर आहे. त्याने नोकरी करताना त्रास देण्यास सुरूवात केली. सप्टेबर 2016 मध्ये त्याने डॉलीला हॉस्पिटलमधील एका रूममध्ये बोलावले आणि नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. डॉलीला कोल्ड्रींक्‍समधून गुंगीचे औषध देऊन त्याने बळजबरी करीत तिच्यावर बलात्कार केला. तेव्हापासून तिला रूममवर बोलावून नेहमी लैंगिक शोषण करीत होता. या दरम्यान त्याने मोबाईलने तिचे अश्‍लिल फोटो आणि बेडरूममधील काही व्हीडिओ शुटींग केले. तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर वारंवार बलात्कार करीत होता. नोकरी जाण्याच्या आणि बदनामीच्या भीतीपोटी ती अत्याचार सहन करीत होती. शेवटी तिने एका मैत्रिणीला हा प्रकार सांगितला. तिने पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. डॉलीच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अटक केली. डॉ. शेखरने बीएएमएस केले असून, तो मूळचा अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील रहिवासी आहे. 

Web Title: nagpur news doctor Torture on the nurse