आंबेडकरी चळवळीचे केंद्र ज्ञानसंग्रह वाचनालय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नागपूर - पुस्तकांसाठी राजगृह बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा मंत्र दिला. सोबतच ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’, हा मोलाचा सल्ला दिल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील पहिल्या पिढीने डॉ. आंबेडकरांप्रमाणेच शिक्षणाला आणि पुस्तकाला अधिक महत्त्व दिले. त्यातूनच उत्तर नागपूर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र बनले आणि येथील बारसेनगरात डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या पुढाकारातून उभे राहिले ज्ञानसंग्रह वाचनालय.

या वाचनालयाची हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे. हे वाचनालय म्हणजे आंबेडकरी चळवळीचे केंद्र बनले. 

समाजाला जागृत करण्याचे काम याच वाचनालयातून सुरू झाले. त्या पहिल्या पिढीत डॉ. गंगाधर पानतावणे, ताराचंद्र खांडेकर, इ. मो. नारनवरे, डॉ. भाऊ लोखंडे, प्रा. रणजित मेश्राम, डॉ.  धनराज डहाट, का. रा. वालदेकर अशा विचारवंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार येथील झोपडीपर्यंत पोहोचवले.

मराठवाड्यातील नामांतर आंदोलन असो, मनुवादाने घाटकोपर येथील रमाई आंबेडकरनगरची घटना असो की, रिडल्सचा लढा असो आंदोलनाची बैठक याच वाचनालयात होत आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता विचारवंत तयार करण्याचे काम याच वाचनालयातून झाल्याचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्यासाठी ज्ञानसंग्रह सारखी वाचनालयातून विद्यार्थिदशेतूनच अभ्यासू कार्यकर्ते घडतील ही दूरदृष्टी डॉ. गंगाधर पानतावणे यांनी जोपासली होती.

Web Title: nagpur news Dr. Gangadhar Pantawane Center for the Ambedkar movement Knowledge-based library