26 किलो गांजा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - विदर्भातील कुख्यात गांजा तस्कर लाजरस अँथोनी डेवीडला (39, रा. आरसी चर्च कंपाउंड, न्यू टाउन बडनेरा, अमरावती) एनडीपीएस विभागाने अटक केली. तो विदर्भातील डीलर असून, त्याच्याकडे नागपूरसह अन्य जिल्ह्यांत गांजा तस्करीची जबाबदारी आहे. 

अमरावतीवरून मोठा गांजा तस्कर नागपुरात आला असून, त्याच्याकडे 50 किलोंपेक्षा जास्त गांजा असल्याची माहिती टीपरने सहायक पोलिस आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांना दिली. शनिवारी दुपारी चार वाजता पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांनी जरीपटक्‍यातील राय गुलमोहर अपार्टमेंटसमोर 35 ते 40 वयोगटातील युवकाचा पाठलाग केला. त्याच्याकडील थैलीत गांजा असल्याचे लक्षात आले. मात्र, त्याचा कुणी साथीदार आहे का? कुणी खरीददार येतोय का? यासाठी पोलिस वाट पाहत होते. शेवटी त्याला संशय आल्यामुळे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 2 लाख 61 हजार रुपये किमतीचा 26 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला. डेवीडच्या माध्यमातून परप्रांतातील गांजा तस्काराची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: nagpur news drug ganja