मध्य रेल्वेच्या जागेवर डम्पिंग यार्ड!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

कचरा रिचविण्यासाठी भिंत तोडली : रिच रोडच्या मागणीकडे दुर्लक्ष

नागपूर - अजनी रेल्वे कॉलनीतून बाहेर पडण्यासाठी रिच रोड काढण्याच्‍या मागणीकडे दुर्लक्ष करीत  कनक रिसोर्सेसकडून सुरक्षा भिंत फोडून रेल्वेच्या जागेवरच कचरा टाकणे सुरू आहे. माजी नगरसेवक तनवीर अहमद यांनी याला विरोध केला आहे.

अजनी रेल्वे कॉलनीच्या मधून जाण्यायेण्याचा मार्ग नसल्याने नागरिकांना वळसा घालून जावे लागते. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी रिच रोड काढण्याचे प्रयत्नही झाले. परंतु, रेल्वे प्रशासनाच्या ‘हठयोगा’मुळे हा मार्ग होऊ शकला नाही. दुसरीकडे शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कनकने कचरा टाकण्यासाठी केंद्रीय विद्यालयाची सुरक्षा भिंत तोडली. अनेक दिवस कचऱ्याची उचल होत नसल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण आहे. या जागेलगतच रेल्वेचे क्वॉर्टर, रेल्वेची इमारत आणि समोर लोहमार्ग पोलिसांचे हेडक्वॉर्टर आहे. कचऱ्यामुळे विद्यार्थी व रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याकडे तनवीर अहमद यांनी लक्ष वेधले.

कचरागाड्या गेल्या कुठे?
महापालिकेला खासदार निधीतून २००० साली कचरागाड्या खरेदीसाठी १.२५ कोटींचा निधी दिला होता. त्याच काळात नागपूरला संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानचा प्रथम पुरस्कारही मिळाला. त्या कचरागाड्या गेल्या कुठे, असा सवाल अहमद यांनी उपस्थित केला आहे.

बेकायदेशीररीत्या कचरादहन
उघड्यावर कचरा जाळणे बेकायदेशीर असून, त्यासाठी कारवाईची तरतूदही आहे. यानंतरही रेल्वेच्या जागेवर टाकला जाणारा कचरा बेदरकारपणे जिथेच जाळलाही जातो. स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही धोकादायक बाब असल्याचे अहमद यांनी सांगितले.

Web Title: nagpur news dumping yard on central railway place