खाद्यतेल प्रतिकिलो तीन रुपयांनी महाग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नागपूर - केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर गेल्या 15 दिवसांत खाद्यतेलाच्या भावात प्रतिकिलो तीन ते साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचे खिसे हलके होणार आहेत. 

नागपूर - केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर गेल्या 15 दिवसांत खाद्यतेलाच्या भावात प्रतिकिलो तीन ते साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचे खिसे हलके होणार आहेत. 

सोयाबीन आयात शुल्क साडेबारा टक्‍क्‍यांवरून साडेसतरा टक्के झाले आहे. पाम तेलाचे आयात शुल्क 15 टक्के, रिफाइंड पामोलिन तेलावरील शुल्क 25 टक्के केले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सोयाबीन, पामतेल, वनस्पती तुपाच्या भावावर पडला होता. त्याचा परिणाम आता इतरही तेलांवर पडू लागला आहे. शेंगदाणा तेलवगळता इतर खाद्य तेलांच्या भावात या आठवड्यात प्रतिकिलो तीन ते साडेतीन रुपये किलोने वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कडधान्य आणि डाळीचे भाव कमी आहेत. यावर्षी चांगले उत्पादन झाल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. गुळाचे भाव तेजीत असून नारळाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात गुळाची बाजारातील आवक मागणीपेक्षा जास्त झाल्याने त्याचे भाव 70 रुपयांनी कमी झाले. मात्र, या आठवड्यात त्यात तेजी आली आहे. दिवाळीपर्यंत गुळाची मागणी वाढणार आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

नारळाच्या उत्पादनाला फटका 
गणेशोत्सव आणि महालक्ष्मीच्या निमित्ताने नारळाची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवासाठी किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी वाढू लागली आहे. गौरी गणपतीच्या सणासाठी रवा, मैदा आणि बेसनाची मागणी वाढू लागली आहे. तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. कर्नाटकामध्ये यंदा नारळाचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचा फटका खोबऱ्याच्या उत्पादनाला बसला आहे. त्याच्या भावात वाढ झाली आहे. 

तांदळाचेही भाव वाढले 
कच्चा मालाची आवक कमी झाल्याचा परिणाम पोहा उत्पादनावर झाला आहे. आवक कमी असल्याने कच्चा मालाचे भाव वाढले. त्यामुळे पोह्याच्या भावात 50 रुपये इतकी वाढ झाली. भाजक्‍या पोह्याचे भाव 20 ते 25 रुपयांनी वधारले आहे. उत्पादन घटल्याने आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यातून तांदळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे तांदळाचे भाव वाढले आहेत.

Web Title: nagpur news Edible oil