'शैक्षणिक धोरण लवकरच बदलणार '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नागपूर - शिक्षणानेच युवकांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. मात्र सध्याच्या काळात सुरू असलेल्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याची गरज आहेत. देशाच्या विकासासाठी स्वयंरोजगाराला प्रोत्साहित करणे आवश्‍यक असून नव्या धोरणाच्या मसुद्यावर काम सुरू असून त्यात नवे बदल दिसतील, असे केंद्रीय मानव संसाधन विकास तसेच जलसंसाधन मंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी सांगितले. 

सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात डॉ. सत्यपालसिंग  सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते. फार्मसी विषयावर बोलताना ते म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रमात ॲलोपॅथीसोबतच आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच युनानी औषधांचाही माहितीचा समावेश असावा. या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांना आपण सूचना देणार आहोत. ज्या दिवशी आई-वडील हेच खरे ईश्‍वर आहेत हे आपण मुलांना शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाईल, त्यावेळी वृद्धाश्रमांची देशात गरज भासणार नाही. शिक्षणाचा सर्वांत मोठा उद्देश समग्र विकास आहे. तेव्हाच शारीरिक, बौद्धिक विकास होऊन देशातील वातावरण बदलेल. तंत्रज्ञानाने आजार काय आहे हे समजते. मात्र स्वस्थ कसे राहावे हे सांगू शकत नाही. सध्या ५० टक्के अभियांत्रिकीच्या जागा रिक्त आहेत. यावरून शैक्षणिक धोरणात बदल करण्याची आता आवश्‍यकता आहे असे दिसून येते, असेही सत्यपालसिंग म्हणाले. यावेळी संस्थेचे संस्थापक माजी मंत्री अनीस अहमद, श्रीमती विमला, अतुल कोटेचा, जुल्फिकार भुट्टो प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: nagpur news Educational strategies will soon change Satyapal Singh