राज्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नागपूर - राज्यात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक आठ हजार ६५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. देशाच्या नकाशावर नजर टाकल्यास शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्राचा देशात सर्वांत  वरचा क्रमाक असल्याची माहिती विधान परिषदेतील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी आज येथे दिली. 

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल क्राइम ब्युरोकडून देशभरात घडलेल्या दिलेल्या अहवाल २९ राज्यातील गुन्ह्यांचा तपशील मांडल्याचे विधान परिषदेत २६० अन्वये आयोजित चर्चेत केले. त्यात महाराष्ट्रात कृषी, सावकारी कर्ज, नापिकी, दुष्काळ व शेतीसंबंधित कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला तपशील सादर केला आहे. २०१४ ते जुलै २०१७ पर्यंतची ही आकडेवारी आहे. मध्य प्रदेशात ४ हजार ९८, कर्नाटकात २ हजार ४४८ तर गुजरातमध्ये फक्त ९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा अर्थ गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रात २४ हजार ३१५ शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या राज्य सरकारने देशातील सर्वांत मोठी ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही राज्यात ३९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आज शेतमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये एल्गार वाढला  आहे.

शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिले जात आहे. काद्यांचे भाव वाढून द्या म्हणून शेतकरी मोर्चे काढत आहेत. सर्वाधिक कडधान्य पिकवा म्हणजे आपल्याला कडधान्य आयात करावे लागणार नाही. कडधान्यांना योग्य भाव मिळाला जाईल अशी हमी दिली. शेतकरी वर्ग कडधान्य लागवडीकडे वळाला. वर्षापूर्वी तुरीला मिळालेला हमीभाव यामुळे राज्यभर तुरीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले. तुरीला भाव मिळाले नाही. यंदा शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीनची लागवड केल्याने त्याची अवस्था तुरीसारखी झाली असल्याचे ते म्हणाले. रायगड जिल्ह्यात दोन वर्षांत तब्बल ४०- कोटी डिझेलचा परतावा देण्यात आलेला नाही. सरकारने ज्यांनी लाभत घेतला नाही, अशानाच लाभार्थी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com