साखळी फेकून करतात वीजपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

धानला - सिंगोरी या गावावरूनच मोहाळी, गोवरी, कोटगाव, बोरगाव, महादुला या गावाला चिरव्हा सब स्टेशनवरून लाइन पुरविली जाते. अलीकडेच येथील अज्ञात नागरिकांनी गेल्या ८ ते १० दिवसांपासून ११ के. व्ही. चालू वीज वाहिनीवर लोखंडी साखळी फेकून एबी स्विच बंद करून व समोरील गाव अंधारात ठेवण्याचा  खेळ सुरू केला आहे त्यामुळे  वीज वाहिनी बंद होत असते व याचा त्रास नागरिकांना होतो. याचे खापर महावितरण कंपनीवर फोडण्यात येते. ही बाब गंभीर असून या वेळेस विद्युत तार तुटण्याची दाट शक्‍यता असते. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे ओल्या मातीतून वीजपुरवठा खूप दूरपर्यंत जाऊन धोका होण्याची शक्‍यता असते.

धानला - सिंगोरी या गावावरूनच मोहाळी, गोवरी, कोटगाव, बोरगाव, महादुला या गावाला चिरव्हा सब स्टेशनवरून लाइन पुरविली जाते. अलीकडेच येथील अज्ञात नागरिकांनी गेल्या ८ ते १० दिवसांपासून ११ के. व्ही. चालू वीज वाहिनीवर लोखंडी साखळी फेकून एबी स्विच बंद करून व समोरील गाव अंधारात ठेवण्याचा  खेळ सुरू केला आहे त्यामुळे  वीज वाहिनी बंद होत असते व याचा त्रास नागरिकांना होतो. याचे खापर महावितरण कंपनीवर फोडण्यात येते. ही बाब गंभीर असून या वेळेस विद्युत तार तुटण्याची दाट शक्‍यता असते. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे ओल्या मातीतून वीजपुरवठा खूप दूरपर्यंत जाऊन धोका होण्याची शक्‍यता असते. अशावेळी नागरिकांना पडलेला तार आढळल्यास त्यांनी महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांना फोन करून होणारा अनर्थ टाळण्यासाठी मदत करावी असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच सहाय्यक अभियंता अविनाश तांडेकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात आरोपींना शोधून कारवाईची मागणीही केली.

Web Title: nagpur news electricity