फेसबूकवरून "बिट कॉइन' कोटींचा व्यवसाय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नागपूर - मलेशियातील दोघांनी फेसबूकच्या माध्यमातून भारतातील गुंतवणूकदारांना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. आभासी चलन असलेल्या बिट कॉइनच्या व्यवसायात लाखोंनी गुंतवणूक केली. मागील आठ महिन्यांत हजारो कोटींनी गंडा घालून एकाने मलेशियात पलायन केले, तर दुसरा मुंबईतून पसार झाला. फेसबूकच्या माध्यमातून फसवणूक केल्याची माहिती आहे. नागपुरात जवळपास पाच कोटींची फसवणूक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

लुसी ऊर्फ बहारुद्दीन युनूस सिद्धिकी आणि रोमजी बीन अहमद (रा. मलेशिया) हे दोघे फेब्रुवारी 2017 ला भारतात आले. त्यांनी फ्यूचर बिट कंपनी' काढली. फेसबूकवरून त्यांनी कंपनीची जाहिरात केली. त्यात व्हिडिओ अपलोड केले. त्यामध्ये लाखो रुपये कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारतातून लाखो गुंतवणूकदारांनी बिट कॉइनचा व्यवसाय जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लुसी आणि रोमजी यांनी मुंबई, औरंगाबाद, शिर्डी, नागपूर, पुणे, गोंदिया आणि नाशिक येथील मोठमोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार घेतले. नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये 5 मार्च 2017 मध्ये सेमिनार घेतला आणि एकाच सेमिनारमधून दोन्ही आरोपींना जवळपास शंभरावर लखोपती जाळ्यात अडकले. इंजिनिअर मयूरेश गणोरकर यांनी पहिल्यांदाच 26 लाख रुपयांचे 25 बिट कॉइन विकत घेतले. त्यांचे बिट कॉइनच्या पोर्टलवर डिजिटल खाते उघडल्या गेले आणि त्यात रोज दीड टक्‍के व्याज मिळत होते. पाच महिन्यातच बिट कॉइनचे भांडे फुटले आणि गणोरकर यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. नाशिकमध्ये याबाबत गुन्हा दाखल असून रोमजी बीनला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आल्यानंतर फरार झाला आहे. 

गुन्हे शाखेत बयाणासाठी गर्दी 
नागपुरात प्राथमिक स्वरूपात 200 ते 300 गुंतवणूकदार असल्याची माहिती आहे. सध्या आठ ते दहा जणांचे बयाण गुन्हे शाखेच्या आर्थिक विंगचे पोलिस निरीक्षक गणेश ठाकरे यांनी नोंदवले. तक्रारींचा ओघ वाढत असून नागपुरातून प्राथमिक स्वरूपात पाच कोटींपेक्षा जास्त फसवणूक असल्याची माहिती आहे. सध्या 2 डॉक्‍टर्स, 1 प्राध्यापक आणि शिक्षक तसेच 2 अभियंत्यांचे बयाण घेण्यात आले. 

1 बिट कॉईन 3 लाख 67 हजारांचा 
बिट कॉईन हा युरो, डॉलर आणि यान या विदेशी चलनात रूपांतरित होतात. 2009 मध्ये एका बिटकॉईनची किंमत केवळ 6 रुपये होती. त्याची किंमत शेअर्स बाजारापेक्षाही वेगाने वाढते. आज ऑगस्ट 2017 मध्ये एका बिट कॉइनची किंमत 3 लाख 67 हजार रुपये आहे. 

Web Title: nagpur news facebook