बळीराजासाठी अन्नत्याग शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चिंतन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमेटी, जय जवान जय किसान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक फाशी घेऊन शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.

नागपूर : आसमानी आणि सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. प्रथम शेतकरी हुतात्मा साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी सहकुटूंब आत्महत्या केली. या घटनेच्या स्मरणार्थ विविध संघटनांनी सोमवारी अन्नत्याग आंदोलन करीत पोशिंद्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधून घेतले. 

जनमंच व ऍग्रोवेट- ऍग्रो इंजी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था संघटना, विद्यार्थी, वकील, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभागी होत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधून घेतले. शेतकरी आत्महत्या, सरकारी धोरण, आत्महत्या थांबविण्यासाठीचे उपाय, शेतकऱ्यांचा सन्मान आदी विषयावर यावेळी चिंतन करण्यात आले. 

शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमेटी, जय जवान जय किसान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक फाशी घेऊन शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.

Web Title: Nagpur news farmer agitation in Nagpur