शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नागपूर - थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. वीजबिलाची मुद्दल भरल्यास दंड, व्याज माफ करण्यात येणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. 

राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांवर १९ हजार २७२ हजार कोटींची थकबाकी आहे. या योजनेअंतर्गत ८ हजार १६४ कोटी, तर २१८ कोटी दंडाची रक्कम माफ होणार आहे. या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. शेतकऱ्यांना वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणतर्फे गाव पातळीवर शिबिर लावण्यात येणार असून, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रावरील थकबाकी १ टक्के असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

आठ दिवसांनंतर कापणार कनेक्‍शन
शेतकऱ्यांकडे गेल्या चार, पाच वर्षांपासूनची थकबाकी आहे. बाहेरून जास्त दाराने वीज खरेदी करावी लागत आहे. पैसा नसेल तर वीज खरेदी करता येणार नाही. यामुळे भारनियमन करण्याची वेळ येणार आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत थकीत रक्कम भरण्याचे आवाहन त्यांनी केले. चालू महिन्याच्या बिलाची रक्कम सात दिवसांत भरली नाही, तर आठव्या दिवसांनंतर वीज कनेक्‍शन कापण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन वर्षांत एकही कनेक्‍शन कापले नसल्याचे स्पष्ट करीत यावर्षी मात्र थकबाकीदार शेतकऱ्यांचे कनेक्‍शन कापल्याची कबुली त्यांनी दिली. 

अशी आहे योजना
शेतकऱ्यांना चालू बिल येत्या सात दिवसांत भरावे लागणार आहे. ३० हजारांच्या आतील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाच टप्पे पाडून देण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत  पहिला हप्ता भरायचा आहे. त्यानंतरचा हप्ता भरण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर महिन्यात हा पैसा भरावा लागणार आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त रक्कम थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दहा हप्त्यात हा पैसा भरायचा असून, यासाठी त्यांना  दीड महिन्याच्या कालावधी देण्यात येणार आहे.

Web Title: nagpur news farmer agriculture