शेतकऱ्यांच्या हातावर तुरी 

शेतकऱ्यांच्या हातावर तुरी 

नागपूर - गतवर्षी झालेले तुरीचे बंपर उत्पादन, त्यानंतर खरेदीत झालेला घोळ पाहता यंदा तुरीची शासकीय खरेदी जपून करण्यावर शासनाचा भर असल्याचे दिसून येते. शासकीय तूरखरेदीला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत नाफेड केंद्रावर केवळ 28 हजार 880 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंतची सर्वांत संथ खरेदी असल्याचा आरोपी शेतकरी करीत आहेत. दुसरीकडे चुकारे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तर हरभरा खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागली आहे. 

जिल्ह्यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संस्था व कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर (कळमना), काटोल, उमरेड, भिवापूर, कळमेश्वर, सावनेर, नरखेड, रामटेक येथे नाफेड खरेदी केंद्रे सुरू आहेत. बाजार समितीमध्ये तूर आणण्यापूर्वी केंद्रास भेट देऊन शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक होते. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, बॅंक पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्‍स प्रत व 7/12 चा पीकपेऱ्यासह उतारा आदी कागदपत्रे सादर करावी लागत असल्याने ही प्रक्रिया जाचक ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ऑनलाइन नोंदणीनुसार शेतकऱ्यांना एसएमएसच्या माध्यमातून तूर केव्हा विक्रीस आणावी कळविण्यात येत आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी मॅसेज आले नसल्याचा आरोप केला. तूरखरेदीचे पैसे ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असले तरी ते अद्याप जमा झाले नाहीत. चाळणी करून एफएक्‍यू. दर्जाची स्वच्छ, वाळवून साफ केलेली तूरखरेदी केली जात असल्याने शासनाचा हमीभाव फार कमी शेतकऱ्यांना मिळाला आहे. नाइलाजास्तव शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना विकत आहेत. बाजार समिती पदाधिकारी शासनाच्या या अट्टहासापुढे निशस्त्र झाले असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात आहे. 

मागच्या वर्षी बाजार समित्यामंध्ये विक्रमी खरेदी झाली. यंदा तुरीचा पेरा कमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 60 टक्के खरेदीचा अंदाज आहे. यंदा तुरीमध्ये मुलन अधिक असल्याने एफएक्‍यू दर्जा मिळावा यासाठी चाळणी लावूनच माल खरेदी केला जात आहे. हरभरा खरेदी एक महिनाभरापूर्वीपासून सुरू करण्यात आली असून बाजार समितीमध्ये माल आल्यावर लवकरच खरेदी सुरू करू. 
- डॉ. अतुल नेरकर, जिल्हा पणन अधिकारी, नागपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com