जावई-मुलीने केला वडिलांचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

नागपूर  - मुलगी आणि जावयाने सासऱ्याचा गळा आवळून खून केला. मृतदेह बॅगेत भरून ऑटोतून रेल्वेस्थानकावर नेत असताना ऑटोचालकाच्या दक्षतेमुळे त्यांचा डाव फसला. ऑटोचालकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोचेपर्यंत आरोपी पळून गेले. याप्रकरणी ऑटोचालकाच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजता माटे चौकात उघडकीस आली. 

मानसिंग सुवरसिंग शिव (वय 52) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. तर, विजय अशोक तिवारी (वय 26) आणि त्याची पत्नी किरण (वय 24) अशी आरोपींची नावे आहेत. विनोद तिवारी हा मूळचा बुलडाण्यातील असून, तो पॉलिटेक्‍निकच्या शिक्षणासाठी नागपुरात आला. त्या वेळी वर्गमैत्रीण किरणशी त्याची ओळख झाली. शिक्षणादरम्यान दोघांची मैत्री होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तेव्हापासून दोघेही सोबतच राहत होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकुलती मुलगी आणि आंतरजातीय विवाहास वडील मानसिंग शिव यांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही लग्न न करता "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. त्यांना दोन वर्षांचा युवराज नावाचा मुलगासुद्धा आहे. तरीही लग्नास विरोध करून घरात न राहण्याबाबत वडिलांनी तंबी दिली होती. तेव्हापासून घरात वादास ठिणगी पडली होती.

Web Title: nagpur news Father's murder