चार आरामशीनना भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नागपूर - नागपूर-भंडारा मार्गावरील महालगाव कापसी (बु.) परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास चार आरामशीनला आग लागली. या आगीत सागवानाच्या लाकडासहित कोट्यवधींचा मुद्देमाल जळून खाक झाला. अग्निशमन विभागाच्या कठोर परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. रत्नानी टिंबर मार्ट शांतीलाल मंजी पटेल अँड कंपनी, सारंग टिंबर ट्रेडिंग आणि सिद्धिविनायक टिंबर ट्रेडिंगला काल मध्यरात्री आग लागली.  आगीचे रौद्र रूप पाहून तत्काळ घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. 

अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. ही आग उशिरापर्यंत धगधगत होती. सारंग टिंबर ट्रेडिंगचे संचालक योगेश पटेल आणि सिद्धिविनायक ट्रेडिंगचे संचालक अश्विन पटेल यांची आरामशीन पूर्णत: जळून खाक झाली. यात काही भारतीय सागवान आणि आफ्रिकन सागवानाचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान भारतीय सागवानाचे झाले आहे. दोन्ही सागवान एकसारखेच दिसत असले तरी वजनातून त्यांचा प्रकार वेगळा असल्याचे लक्षात येते. उर्वरित दोन आरामशीनचे काही नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानाचा नेमका आकडा कळू शकला नाही. आरामशीन कारखान्यात अग्निशमन यंत्रणेची कोणतीही सोय नाही. शनिवारी दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण वाढविण्याचे प्रयत्न सुरूच होते. त्यामुळे अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात आठ तास लागल्याचेही अग्निशमन अधिकाऱ्यांने सांगितले.

Web Title: nagpur news fire

टॅग्स